Breaking News

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना हशा पिकवला आणि एका सहभागीने “नूब” हा शब्द सांगितल्यावर विरोधी पक्षावर टीकास्त्र सोडले. पीएम मोदींनी एक्स या सोशल मायक्रोब्लोगिंग साईटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, गेमर त्यांना “ग्राइंड” आणि “नूब” सारख्या काही …

Read More »

राज ठाकरे यांचा उपरोधिक टोला, जी टीका केली ती ४० आमदार फोडले म्हणून…

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच जाहिर सभा घेत राज्यातील भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. या पाठिंब्यावरून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे यांच्यावर टीका होऊ लागली. या टीकेला राज ठाकरे यांनी आज प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी शिवसेना उबाठा …

Read More »

देशांतर्गत ऑटोमोबाईल विक्रीत वाढ इंडियन ऑटोमोबाईल सियाम संघटनेची माहिती

भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने समाधानकारक कामगिरी नोंदवली आहे, गेल्या आर्थिक वर्षात (FY24) देशांतर्गत उद्योग १२.५ टक्क्यांनी वाढून २,३८,५३,४६३ युनिट्सवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी २,१२.०४,८४६ होता, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) यांनी शुक्रवारी सांगितले. प्रवासी वाहन (पीव्ही) विभागात, आर्थिक वर्ष २३ मधील ३८,९०,११४ युनिट्सच्या तुलनेत वर्षभरात एकूण घाऊक (डीलर्सना पाठवणे) …

Read More »

टीसीएसने जाहिर केला बंपर डिव्हीडंट जाहिर १०४ टक्के डिव्हिडंट

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात टीसीएस (TCS) ने शुक्रवारी सांगितले की त्यांच्या शेअरहोल्डर पेआउट, ज्यामध्ये शेअर बायबॅक आणि लाभांश यांचा समावेश आहे, FY2024 मध्ये ४६,२२३ कोटी रुपये होते. शुक्रवारी TCS ने २८ रुपये प्रति शेअर अंतिम लाभांश जाहीर केला. हे आर्थिक वर्षात जाहीर केलेल्या ४५ रुपये प्रति शेअर लाभांशाच्या व्यतिरिक्त …

Read More »

घर आणि इतर खरेदीसाठी ६ वेळा क्रेडिट कार्ड वापराल तर हाती इन्कम टॅक्सची नोटीस प्रत्येक खात्यावर राहणार आयकर विभागाचे लक्ष

इन्कम टॅक्स विभागाने सर्व आर्थिक ठेवी आणि पैसे काढण्याचा काळजीपूर्वक गोष्टींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली असून नागरिकांकडून आयटी विभाग कर अनुपालनाची पडताळणी करण्यासाठी वेगवेगळ्या स्त्रोतांकडील डेटा वारण्यास सुरुावत केली आहे. काही व्यवहारांची अतिरिक्त छाननी सुरू करतात. उदाहरणार्थ, कर विभाग सर्व उच्च-मूल्यांच्या रोख व्यवहारांवर बारीक नजर ठेवतो. जसे बचत खाते असलेल्या …

Read More »

मार्च अखेर किरकोळ बाजारातील महागाई दर ४.८५ टक्के ग्राहक किंमत निर्देशांकात महागाई अद्यापही चढ्या क्रमानेच

२०२४ साठी किरकोळ बाजारातील महागाई दर ४% च्या वर राहिली आणि ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित खाद्यान्न महागाई मार्च २०२४ मध्ये किरकोळपणे ४.८५% पर्यंत कमी झाली जी एका महिन्यापूर्वी ५.०९% होती. तथापि, औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने मोजलेल्या फॅक्टरी आउटपुटसह आर्थिक क्रियाकलाप या वर्षी फेब्रुवारीमध्ये ५.७ % पर्यंत वाढले आहेत, जे चार महिन्यांचा …

Read More »

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधींच्या प्रचार सभांचा विदर्भात झंझावात

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरु असून काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभांचा झंझावातही सुरु झाला आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांची उद्या शनिवार १३ एप्रिल रोजी दुपारी ३ वा. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील गजानन महाराज मंदिराच्या …

Read More »

नाना पटोले यांचा गंभीर इशारा, मोदी पुन्हा सत्तेत आल्यास…राजासारखे…

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाचे उमेदवार मोदींच्या नावाने मताचा जोगवा मागत आहेत. मोदींना मतदान का करायचे? मोदींनी महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, शेतकरी उद्धवस्त केला, गरिबी वाढवली, आपले जवान सीमेवर दररोज शहिद होत आहेत म्हणून मतदान करायचे का? असा सवाल विचारात मोदींना मतदान मागण्याचा काही अधिकार नाही. मोदी पुन्हा सत्तेत आल्यास ‘वन …

Read More »

राज्यात पुन्हा गांधी विरूध्द आंबेडकर राजकीय वाद

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना आगामी निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये असे जाहिर वक्तव्य केले. त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तुषार गांधी यांच्यावर पलटवार केला. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा गांधी विरूध्द आंबेडकर असा वाद पाह्यला मिळाला. तुषार गांधी यांनी केलेल्या …

Read More »

परराराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना इशारा, इराण-इस्त्रायलचा प्रवास टाळा

परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एक अधिसूचना जारी करून भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराण आणि इस्रायलचा प्रवास टाळण्यास सांगितले आहे. पुढील ४८ तासांत इराण इस्रायलवर थेट हल्ला करणार असल्याच्या वृत्तांदरम्यान ही बाब समोर आली आहे. मंत्रालयाने सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांना तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधून स्वतःची नोंदणी करण्याचे आवाहन करत …

Read More »