Breaking News

छगन भुजबळ यांची मागणी, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा शूद्र पूर्वी कोण होते पुस्तकाद्वारे डॉ.आंबेडकरांनी पहिल्यांदा मागणी केली होती

बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरवात केलेली आहे. याच धर्तीवर बिहारप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी त्यांना पत्र पाठवित केली. छगन भुजबळ यांनी …

Read More »

गुजरातमधील बंदरांमध्ये आलेले हजारो किलो ड्रग्सचा मुंबईतील समस्येशी संबंध आहे का? मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील ड्रग्सचा फैलाव थांबवा !: सचिन सावंत

मुंबईतील झोपडपट्टी परिसरात ड्रग्सचा फैलाव वाढत चालला आहे. युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे. ड्रग्स च्या फैलावाने देशाचे भविष्य उध्वस्त होत तर आहेच पण अनेक कुटुंबाच्या आशा आकांक्षा ही ध्वस्त होत आहेत. यामागे फार मोठे रॅकेट असून आता शाळेतील मुले ही लक्ष्य होत आहेत. मध्यमवर्गीय गृहनिर्माण संस्थामध्येही याचा प्रसार होत …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या मागण्या व त्यांच्या विविध समस्यांना शासनदरबारी वाचा फोडण्यासाठी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सोमवार ९ जानेवारी रोजी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषी वीज जोडणी, पीक विमा आदी शेतकऱ्यांच्या मागण्या व त्यांच्या विविध समस्यांना शासनदरबारी वाचा फोडण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यवतमाळ जिल्ह्याच्यावतीने आयोजित आक्रोश मोर्चाचे अंबादास दानवे हे नेतृत्व करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज …

Read More »

काँग्रेसचे डॉ विश्वजीत कदम वाकून देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले पुन्हा एकदा भाजपामध्ये जाण्याच्या चर्चेला सुरुवात

काँग्रेसचे दिवगंत नेते डॉ.पतंगराव कदम हे काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून राहिले. मात्र त्यांच्या जाण्यानंतर त्यांचे सुपूत्र डॉ विश्वजीत कदम हे सातत्याने भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. त्यातच आज दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त पुण्यातील धनकवडी येथील भारती विद्यापीठ परिसरात, भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माणाची गरज चीन मधले उद्योग भारतात येण्याची शक्यता

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरकडे नेत असताना देशातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि त्यासाठीची उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारती विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या भारती सुपर स्पेशिआलिटी हॉस्पिटल आणि विद्यार्थी वसतीगृह संकुलाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते …

Read More »

शरद पवार म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता नव्या क्षेत्रातील परिवर्तनाची दिशा भारती विद्यापीठ देईल

आरोग्य विषयक नव्या सुविधा निर्माण करताना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भारती विद्यापीठासारख्या संस्था हे करू शकतील. जगात नवनवे संशोधन होत आहे, बदल होत आहेत, नवे तंत्रज्ञान निर्माण होत आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेचा आधार घेऊन समृद्ध पिढी घडविण्याचा प्रयत्न होत आहे. संशोधनात लक्ष केंद्रीत करून देशासमोरचे प्रश्न सोडविण्याला हातभार …

Read More »

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत आता पवारांची तिसरी जनरेशन, रोहित पवार अध्यक्ष पदी रोहित पवारांनी मांनले सर्वांचे आभार

मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या दोन्ही संघटनांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वरचष्मा आहे. विशेष म्हणजे क्रिकेट या दोन्ही संघटनावर प्रमुख पदाधिकारी अथवा सदस्य कोण असावेत आणि नसावेत याचा बहुतांष निर्णय शरद पवार हेच घेत असल्याची चर्चा सातत्याने या दोन्ही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये होत असते. परंतु आता …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला साताऱ्यातील कांदाटी खोरे, पर्यटन विकास व पोलीस विभागाचा आढावा पर्यटनवाढीसाठी आराखडा करुन प्रभावी अंमलबजावणी करा

कांदाटी खोरे निसर्गसंपन्न असून येथील पर्यटनवाढीसाठी स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या. त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल याचा आराखडा तयार करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरे ता. महाबळेश्वर येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश …

Read More »

राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यावरून विनायक राऊत म्हणाले, सुपारी घेऊन बोलायचा धंदा प्रकल्प गुजरातला नेल्याचे राज ठाकरेंकडून समर्थन

मागील काही दिवसांमध्ये राज्यात येणारे अनेक उद्योग गुजरातसह अन्य राज्यांत गेले. महाराष्ट्रात होणारी कोट्यवधींची गुंतवणूक परराज्यात गेली. याच मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप होत होते. हा वाद मागे पडलेला असतानाच राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्यास काहीही नुकसान होणार नाही, असे विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, उधार घेतलेल्या तांदळाने विद्यार्थ्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न मध्यान्ह भोजनाचा तांदूळ पुरविण्यात केंद्र सरकार असमर्थ

यवतमाळ, जळगाव, पुणेसह सांगली जिल्ह्यातही मध्यान्ह भोजनासाठी लागणारा तांदूळ पुरविण्यात केंद्रसरकार असमर्थ ठरत आहे असा आरोप करतानाच शिल्लक तांदूळ अथवा उधार घेतलेल्या तांदळाने विद्यार्थ्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर शाळा प्रशासन करत आहेत, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत केंद्राचे लक्ष वेधले. जयंत पाटील पुढे आपल्या ट्विटमध्ये …

Read More »