Breaking News

काँग्रेसचे डॉ विश्वजीत कदम वाकून देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले पुन्हा एकदा भाजपामध्ये जाण्याच्या चर्चेला सुरुवात

काँग्रेसचे दिवगंत नेते डॉ.पतंगराव कदम हे काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून राहिले. मात्र त्यांच्या जाण्यानंतर त्यांचे सुपूत्र डॉ विश्वजीत कदम हे सातत्याने भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. त्यातच आज दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त पुण्यातील धनकवडी येथील भारती विद्यापीठ परिसरात, भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचं उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर डॉ. विश्वजीत कदम यांनी त्यांचे फुलाचा गुच्छ देत वाकून पाया पडले. त्यामुळे राजकिय वर्तुळात कदम भाजपात जाणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली.

तसेच या कार्यक्रमाला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक काँग्रेस पक्षाचे नेते आमदार विश्वजीत कदम हे देखील उपस्थित होते.

भारती विद्यापीठ येथील आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने चर्चेत राहिला असून या कार्यक्रमास शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार असल्याने दोन्ही नेते काय बोलणार याकडे लक्ष होते. पण या दोघांनी राजकीय भाष्य करणे टाळले. मात्र या कार्यक्रमाच्या सुरवातीलाच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले. त्यावेळी विश्वजीत कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताच, विश्वजीत कदम हे देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. या गोष्टीमुळे मागील अनेक महिन्या पासून विश्वजीत कदम हे भाजपात प्रवेश करणार या चर्चेला पुन्हा एकदा सोशल मीडियावर सुरुवात झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयाची इमारत पाहिली. त्यानंतर स्टाफ सोबत फोटो काढल्यानंतर तेथून पाच मिनिटाच्या अंतरावर कार्यक्रमाचे ठिकाण होते. ते लक्षात घेता, शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपण सोबत जाऊ या असे म्हणताच देवेंद्र फडणवीस गाडीत बसले आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना झाले. त्यामुळेही राजकिय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले.

Check Also

पंतप्रधान मोदी यांच्या सातारा आणि सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांचे प्रश्न

महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर पुढील महिन्याच्या ७ मे रोजी तिसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *