Breaking News

नोटीस मिळाल्यावर ठाकरे गटाचे देशमुख म्हणाले, मी चौथ्या नोटीसीची वाट बघतोय… यात मुख्यमंत्र्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप

गुजरातमधल्या सूरतहूनच शिंदे गटातून माघार घेतलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अमरावती कार्यालयातून नोटीस पाठविण्यात आली. अवैध मालमत्तेची चौकशी करण्यासाठी १७ जानेवारी रोजी त्यांना अमरावतीच्या कार्यालयात बोलविण्यात आले आहे. एसीबीची नोटीस मिळाल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख म्हणाले, मला आतापर्यंत तीन नोटीसा …

Read More »

बीडीडी चाळकऱ्यांना मिळणार आता मासिक भाडे, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाला गती द्या

वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. मात्र या आढावा बैठकीत बीडीडीतील रहिवाशांना मासिक भाडे देण्याचा निर्णय घेत चाळींच्या कामांना गती देतानाच बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी …

Read More »

अंबादास दानवे यांचा हल्लाबोल, तुटपुंजी रक्कम देऊन सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आक्रमक

अतिवृष्टी,संततधार आदींमुळे त्रस्त शेतकरी मदतीकडे आस लावून बसला असताना पीकविम्याची तुटपुंजी रक्कम देऊन सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत सरकारवर हल्लाबोल केला. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषी वीज जोडणी, पीक विमा आदी शेतकऱ्यांच्या मागण्या व त्यांच्या विविध समस्यांना शासनदरबारी वाचा फोडण्यासाठी शिवसेना …

Read More »

कोकण शिक्षक मतदारसंघासाठी भाजपा-बाळासाहेबांची शिवसेनेकडून उमेदवार जाहिर भाजपा-शिंदे गटाकडून ज्ञानेश्वर म्हात्रे, जणगणनेचा अधिकार केंद्र सरकारलाच

विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पार्टी – बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी होतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी व्यक्त केला. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते. …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी जलसंधारण महामंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून नवी कामे द्या- मुख्यमंत्री

जलसंधारणाची विविध कामे कंत्राटदारांना देताना त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून मगच त्यांना नवीन कामे देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. दरम्यान, जलसंधारण महामंडळाकडील कंत्राटदार नोंदणीची जुनी पद्धत तात्काळ बदलून नवी पारदर्शक, खुली प्रक्रिया राबवून निकष पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांची नोंदणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या संचालक मंडळाची …

Read More »

खेड्यातल्या कार्यकर्त्याच्या भाषणाच्या पुस्तकाचे अनावरण होणे यासारखे दुसरे भाग्य नाही पुस्तक प्रकाशनानंतर खासदार सुनील तटकरे मानले आभार

खेड्यात जन्मलेल्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याचे विधिमंडळातील भाषणाचे पुस्तकाचे अनावरण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये होतेय, यासारखे कुठलं भाग्य असू शकत नाही असा नम्रतापूर्वक उल्लेख खासदार सुनिल तटकरे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांच्या विधिमंडळातील भाषणांची पुस्तिका आज पक्षाचे नेते प्रफुल पटेल, काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या …

Read More »

काँग्रेसचा इशारा, ४५ लाख कामगारांच्या आरोग्याशी खेळ करून अदानीचे घर भरू नका अंधेरीतील कामगार हॉस्पिटलची जागा ‘अदानी’च्या घशात घालण्याचा डाव

अंधेरीतील कामगार हॉस्पिटल मागील चार वर्षापासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. आतापर्यंत २५० कोटी रुपये दुरुस्तीसाठी व ५० कोटी रुपये वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी देण्यात आले असून ESI corporation हे ह़ॉस्पिटल पुन्हा सुरु करण्यास इच्छुक दिसत नाही. अंधेरीच्या कामगार हॉस्पिटलची पाच हजार कोटी रुपये किमतीची जवळपास १२ एकर जमीन अदानी या उद्योगपतीच्या …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा शूद्र पूर्वी कोण होते पुस्तकाद्वारे डॉ.आंबेडकरांनी पहिल्यांदा मागणी केली होती

बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरवात केलेली आहे. याच धर्तीवर बिहारप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी त्यांना पत्र पाठवित केली. छगन भुजबळ यांनी …

Read More »

गुजरातमधील बंदरांमध्ये आलेले हजारो किलो ड्रग्सचा मुंबईतील समस्येशी संबंध आहे का? मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील ड्रग्सचा फैलाव थांबवा !: सचिन सावंत

मुंबईतील झोपडपट्टी परिसरात ड्रग्सचा फैलाव वाढत चालला आहे. युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे. ड्रग्स च्या फैलावाने देशाचे भविष्य उध्वस्त होत तर आहेच पण अनेक कुटुंबाच्या आशा आकांक्षा ही ध्वस्त होत आहेत. यामागे फार मोठे रॅकेट असून आता शाळेतील मुले ही लक्ष्य होत आहेत. मध्यमवर्गीय गृहनिर्माण संस्थामध्येही याचा प्रसार होत …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या मागण्या व त्यांच्या विविध समस्यांना शासनदरबारी वाचा फोडण्यासाठी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सोमवार ९ जानेवारी रोजी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषी वीज जोडणी, पीक विमा आदी शेतकऱ्यांच्या मागण्या व त्यांच्या विविध समस्यांना शासनदरबारी वाचा फोडण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यवतमाळ जिल्ह्याच्यावतीने आयोजित आक्रोश मोर्चाचे अंबादास दानवे हे नेतृत्व करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज …

Read More »