Breaking News

चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त विधान, फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळेसाठी भीक मागितली नव्या राजकिय वादाला सुरुवात

मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अवमानकारक वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात वादंग उठलं होतं. तसेच भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजी राजे यांनीही आक्रमक भूमिका घेतली. या वक्तव्यांच्या निषेधार्थ राज्यपालसह भाजपा विरोधात १७ डिसेंबरला महाविकास आघाडीने मोर्चा देखील आयोजित केला आहे. त्यातच आता राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असं वादग्रस्त विधान केले.

पैठणमधल्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून महापुरुषांचा दाखला देत असताना हे वक्तव्य केले. चंद्रकांत पाटील यांनी संबोधताना म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत, असे पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली असून यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, भाजपात वाचळवीर आहेत, हे चंद्रकांत पाटील यांनी परत दाखवून दिलं आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकवर्गणी आणि लोकसहभातून शाळा उभारल्या. स्वत: जवळील पैसेही या महापुरुषांनी शाळांसाठी खर्च केले. त्यांनी भीक नाही मागितली. भीक म्हणून तीनही महापुरुषांचा अपमान चंद्रकांत पाटील यांनी केला.

चंद्रकांत पाटील यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य हे या व्हिडिओमध्ये ऐका….

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *