Breaking News

वायकरांच्या मागणीला यश: वधावन आणि एचडीआयएलच्या मालमत्तेची विक्री गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्र लिहून कळविली वायकरांना माहिती

मुंबई: प्रतिनिधी

बहुचर्चित पंजाब अँड महाराष्ट्र बँके अर्थात पीएमसीतील आर्थिक घोटाळ्यातील रकमेची वसूली करण्यासाठी राकेश वधावान, सारंग वधावान आणि एचडीआयएलची मालमत्ता विकून वसुली करण्यात येणार आहे. त्यासाठी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची लवकरच जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील यांनी एका पत्राद्वारे आमदार रविंद्र वायकर यांना कळविली. यासंदर्भातील मुद्दा अर्थसंकल्पिय अधिवेशनात वायकर यांनी उपस्थित केला होता. तसेच पीएमएसी बँकेतील घोटाळ्यातील संबधित आरोपींची मालमत्ता जप्त करून खातेधारकांची देणी द्यावी अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली होती.

या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी वधावन यांच्या मालकिची पालघर, वसई, नायगांव, विरार येथील स्थावर व जंगम मालमत्ता आणि १४ चारचाकी वाहने आणि २ जहाजे जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय अलिबाग येथील बंगला, जॉन थॉमस व यास्मीन जुलैद यांच्या एकत्रित मालकीचे पुणे येथील प्लॅट याशिवाय अन्य आरोपींच्या नावे असलेले पंजाब, अमृतसर येथील हॉटेल्सही ताब्यात घेण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अन्य मालमत्तांचा शोध घेण्यात येत असून सध्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचे मुल्यांकन करण्याचे काम सुरु आहे. तसेच या सर्वांची सर्व प्रकारची खातीही सील करण्यात आली आहेत.

या सर्व मालमत्तांचे मुल्याकंन पूर्ण झाले की लवकरच जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्र्यांनी पत्राद्वारे कळविली आहे.

Check Also

मत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *