Breaking News

Tag Archives: pmc bank

पीएमसीसह या २१ बँकांच्या खातेदारांना मिळणार ५ लाख रुपये २९ नोव्हेंबर पर्यंत मिळणार पैसे

मुंबई : प्रतिनिधी २१ बुडीत बँकांच्या ग्राहकांना या वर्षी डिसेंबरपर्यंत पैसे मिळू शकतील. ठेवींवर सरकारच्या असलेल्या हमीखाली हे पैसे खातेदारांना मिळतील. या अंतर्गत खातेधारकांना जास्तीत जास्त ५ लाख रुपये मिळतील. गेल्या महिन्यात संसदेने ठेव विमा आणि पत हमी महामंडळ (सुधारणा) विधेयक, २०२१ मंजूर केले. यानुसार, आरबीआयने बँकांवर स्थगिती लागू केल्याच्या ९० दिवसांच्या आत खातेधारकांना ५ लाख रुपये मिळणार आहेत. बँकांमध्ये ज्या काही ठेवी ठेवल्या जातात, त्या विम्याच्या कक्षेत येतात. याचा अर्थ असा की जर बँक बुडली किंवा दिवाळखोर झाली तर खातेदाराला जास्तीत जास्त ५ लाख रुपये    मिळतील. अलीकडच्या काळात, पीएमसीसह एकूण २१ सहकारी बँका दिवाळखोरीत गेल्या. यामुळे या बँकांच्या सर्व खातेधारकांना या विम्याअंतर्गत पैसे मिळण्याचा हक्क राहणार आहे. बँकांमधील ठेवींचा विमा डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) द्वारे केला जातो. डीआयसीजीसीने म्हटले आहे की, बँकेच्या विमा उतरवलेल्या ठेवींच्या ठेवीदारांना पैसे देण्याची योजना आहे. हे पैसे डिसेंबरपर्यंत मिळू शकतात. डीआयसीजीसीने म्हटले आहे की एकूण २१ बँका त्याच्या कक्षेत आहेत. पीएमसी ही सर्वात मोठी बँक आहे. काही आवश्यक सूचना त्या बँकांना दिल्या आहेत. बँकांना ४५ दिवसांच्या आत आपले दावे सादर करावे लागतील. त्यानंतर या दाव्यांची छाननी केली जाईल. पडताळणी केल्यानंतर पुढील ४५ दिवसात बँकेला पैसे दिले जातील आणि ते पैसे खातेदारांना दिले जातील. याचा अर्थ २९ नोव्हेंबरपर्यंत बँकेच्या दाव्यांची छाननी केली जाईल. DICGC सुधारणा विधेयक ऑगस्ट २०२१ मध्ये संसदेत मंजूर झाले. यामध्ये बँक ठेवींवरील विमाधारक हमी ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. हे पैसे रिझर्व्ह बँकेच्या स्थगिती कालावधीनंतर ९० दिवसांच्या आत दिले गेले पाहिजेत. पूर्वी विम्याची रक्कम एक लाख रुपये असायची. या २१ बँकाच्या ठेवीदारांना मिळेल भरपाई १) अदूर को ऑप. अर्बन बँक, केरळ २) बिदर महिला अर्बन को ऑप बँक, महाराष्ट्र …

Read More »

वायकरांच्या मागणीला यश: वधावन आणि एचडीआयएलच्या मालमत्तेची विक्री गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्र लिहून कळविली वायकरांना माहिती

मुंबई: प्रतिनिधी बहुचर्चित पंजाब अँड महाराष्ट्र बँके अर्थात पीएमसीतील आर्थिक घोटाळ्यातील रकमेची वसूली करण्यासाठी राकेश वधावान, सारंग वधावान आणि एचडीआयएलची मालमत्ता विकून वसुली करण्यात येणार आहे. त्यासाठी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची लवकरच जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील यांनी एका पत्राद्वारे आमदार रविंद्र वायकर यांना …

Read More »

पीएमसी बँक खातेदारांची भाजपा कार्यालयाबाहेर निदर्शने बँकप्रकरणी आरबीआयशी बोलण्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आश्वासन

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दौऱ्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पीएमसी बँक खातेदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला असून भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर या खातेदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खातेदारांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी खातेदारांचे म्हणणे ऐकून घेत याप्रश्नी रिझर्व्ह बँकेशी बोलणार असल्याचे आश्वासन दिले. खातेदारांच्या घोषणेमुळे यापरिसरात काही काळ तणाव …

Read More »