Breaking News

Tag Archives: satej banti patil

नाना पटोले यांची खोचक टीका, नरेंद्र मोदींच्या राज्यात एक माणूस…. भाजपाला सत्तेतून खाली खेचून काँग्रेसला आणा तुम्हाला न्याय देऊ

केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेची लुट चालवली आहे. भाजपाचे सरकार रोज शेतकऱ्यांना लुटत आहे, विद्यार्थ्यांना लुटत आहे, गरिबांना लुटत आहे, छोट्या व्यापाऱ्यांना लुटत आहे, सर्वांना लुटण्याचे काम सुरु आहे. मोदी सरकारच्या राज्यात गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोटबंदी करुन नरेंद्र मोदींनी आपल्याच पैशांसाठी आपल्याला रांगेत उभे केले आणि …

Read More »

कुस्ती, हलगी व मर्दानी खेळांच्या कोल्हापूरी परंपरेने ‘भारत जोडो’ यात्रेचे स्वागत

लाल मातीत सजलेल्या कुस्तीच्या आखाड्यात, कसलेल्या मजबूत शरीरयष्टीचे कोल्हापुरी पैलवान अंगाला तेल लावून उभे ठाकले होते. बाजूला उभ्या असलेल्या वस्तादानी हात उंचावून इशारा करताच सलामी झडली, नजरेला नजर भिडली आणि एकच झटपट सुरू झाली. कोणी एकेरी पट काढत तर कोणी समोरच्याचा तोल जोखत कुस्ती लागली. एकमेकांवर तुटून पडले होते…. आणि …

Read More »

काँग्रेसने मविआची जागा राखली, तर जयश्री जाधव म्हणाल्या “स्वाभिमान राखला” सतेज बंटी पाटीलांचे रणनीती आली कामाला

मागील काही दिवसांपासून राज्यात भाजपाने हिंदूत्व आणि भोंगा विरूध्द आरती असा नवा राजकिय सामना सुरु केल्यानंतर मनसेने त्यात उडी घेतल्याने उत्तर कोल्हापूरची पोट निवडणूक आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका याच मुद्यावर लढली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते. मात्र या दोन्ही मुद्यांना उत्तर कोल्हापूरकरांनी फारशी भीक न घालता काँग्रेसच्या …

Read More »

अजित पवारांकडून मलिक-नितेशला कानपिचक्या तर नारायण राणेंना टोला सिंधुदूर्ग दौऱ्यात काँग्रेस, शिवसेनेच्या मदतीला राष्ट्रवादी

मराठी ई-बातम्या टीम सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीसाठी सिंधुदूर्गात आलेल्या अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या ट्विटर युध्दावरून कानपिचक्या देत त्या ट्विटरवरू कोंबड्याला मांजर करून किंवा कशाला काय म्हणून माझ्या कोकणातील विकासकामांचे प्रश्न सुटणार आहेत का? अशी टोचणी देत कोकणातील मतदारोनो विचारपूर्वक …

Read More »

केंद्राच्या आणि रखडलेल्या एसआरए प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाला हा निर्णय केंद्र शासनाच्या जमिनीवरील मुंबईतील प्रकल्पांचा आढावा

मुंबई : प्रतिनिधी शहरातील विविध भागात असलेल्या केंद्र सरकारच्या मालकीच्या जमिनीवर वसलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुर्नवसन प्रकल्पाबाबत आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र राज्य सरकारच्या मालकीच्या अर्थात महसूली आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मालकीच्या जमिनीवरील झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पांबाबत मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सादर केलेल्या प्रस्तावातील सूचनांना मुख्यमंत्र्यानी …

Read More »

म्हाडा आणि खासगी विकासकांच्या भागीदारीतून आता परवडणारी घरे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) गृहबांधणीत यशस्वी प्रयोग केले आहेत. म्हाडाच्या पारदर्शक, विश्वासार्ह संगणकीय सोडतीमुळे सर्वसामान्य नागरिक गृहस्वप्नपूर्तीसाठी म्हाडाचा पर्याय प्राधान्याने निवडत आहेत. म्हाडा हा गृहनिर्मितीतील विश्वसनीय ब्रँड अधिक व्यापक करण्यावर शासनाचा भर आहे. त्यामुळेच म्हाडा व खासगी विकासकांच्या सहयोगाने संयुक्त भागीदारी प्रकल्पाद्वारे परवडणाऱ्या दरातील गृहनिर्मितीवर …

Read More »

गृह राज्यमंत्री आणि नोडल अधिकाऱ्याच्या आदेशानंतर अखेर अॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल कॉ.सुबोध मोरे, शैलेंद्र कांबळे यांच्या प्रयत्नाला यश

मुंबई : प्रतिनिधी मागासवर्गीय आकाश जाधव या २२ वर्षाच्या दलित तरुणाला हनुमान टेकडी, सांताक्रूझ पूर्व येथे जातियवादी गुंडानी बेदम मारहाण केली. त्यात त्याचा ४डिसेंबर २० रोजी कुपर रुग्णालयात अकाली मृत्यू झाल्यानंतर सदर जातीयवादी गुंडवक अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी पिडीत कुटुंबियांबरोबर, सामाजिक कार्यकर्त्ये कॉ.सुबोध मोरे आणि शैलेद्र कांबळे …

Read More »

कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे राज्यात जनआंदोलन दोन कोटी सह्यांचे निवेदन पक्षाध्यक्ष सोनिया गांधींच्या मार्फत राष्ट्रपतींना सादर करणार

नाशिक- मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीचे निमित्त साधून काँग्रेसने राज्यभरात ‘किसान मजदूर बचाओ दिन’ पाळला व आंदोलन केले. हे कायदे आणून  शेतकरी व कामगारांना उद्योगपतींचे …

Read More »

वायकरांच्या मागणीला यश: वधावन आणि एचडीआयएलच्या मालमत्तेची विक्री गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्र लिहून कळविली वायकरांना माहिती

मुंबई: प्रतिनिधी बहुचर्चित पंजाब अँड महाराष्ट्र बँके अर्थात पीएमसीतील आर्थिक घोटाळ्यातील रकमेची वसूली करण्यासाठी राकेश वधावान, सारंग वधावान आणि एचडीआयएलची मालमत्ता विकून वसुली करण्यात येणार आहे. त्यासाठी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची लवकरच जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील यांनी एका पत्राद्वारे आमदार रविंद्र वायकर यांना …

Read More »

मंत्रालयात ई-फाईल, ई-लीव्ह, एमआयएस प्रणाली सुरू होणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे ई-ऑफिस सुरु करण्यासंदर्भात आदेश

मुंबई : प्रतिनिधी प्रशासकीय व्यवस्था गतिमान करतानाच जनतेलाही चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी ई-ऑफिस प्रणाली आणखी सक्षम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. त्यानुसार मंत्रालयातील नस्ती व्यवस्थापन ई-फाईल, रजा व्यवस्थापन ई-लीव्ह, ज्ञान व्यवस्थापन केएमएस, माहिती व्यवस्थापन एमआयएस या प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहेत. मंत्रालयातील ई-ऑफिस प्रणालीबाबत सादरीकरण तसेच आढावा बैठक मुख्यमंत्री …

Read More »