Breaking News

मंदिराच्या आत शरद पवार गेलेच नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितले “हे” कारण अखेर दगडूशेठ हलवाई समितीनेच मंदिराबाहेर केला शरद पवारांचा सन्मान

सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मंदिरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे जाण्याचे टाळतात कदाचित त्यांचा फुले-शाहु-आंबेडकर विचारधारेवर प्रचंड विश्वास असल्याने पवार हे शक्यतो मंदिरात जाण्याचे टाळतात.

मात्र आज पुण्यात भिडे वाड्याची पाहणी कऱण्यासाठी शरद पवार हे पुण्यात गेले. त्यावेळी भिडेवाड्यासमोरच असलेल्या दगडूशेठ हलवाई मंदिर समितीला ही माहिती कळताच समितीने शरद पवारांना मंदिरात येण्याचा आग्रह धरला. परंतु शरद पवार हे मंदिरात गेले नाहीतच. त्यामुळे अखेर मंदिर समितीने मंदिराबाहेरच शरद पवारांना दगडूशेठ हलवाईची प्रतिकृती देत सन्मान करत सत्कार केला.

काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे नास्तिक असून ते मंदिरांमध्ये जात नाहीत असे सांगत पवारांच्या नास्तिकतेचे कौतुक केले. मात्र त्यानंतर बराच वाद निर्माण झाला. असं असतानाच आज शरद पवार पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरामध्ये पोहोचले. यावेळी मंदिराच्या विश्वस्तांनी पवारांचं स्वागतही केलं. मात्र शरद पवारांनी मंदिरामध्ये एका खास कारणामुळे प्रवेश केला नाही. यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसनेच दिली.

शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भिडे वाडयाची बाहेरून पाहणी केली. त्यानंतर ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. मात्र शरद पवार मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेऊन पुढे रवाना झाले. शरद पवार या ठिकाणी आले तेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या विश्वस्तांकडून शरद पवारांचा सत्कार करण्यात आला.

शरद पवार यांच्या समर्थकांनी यावेळी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. मात्र पवार यांनी मंदिरामध्ये प्रवेश केला नाही. यामागील कारणाचा खुलासा राष्ट्रवादीनेच केला.

भिडे वाड्याच्या पाहणीसाठी शरद पवार येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विश्वस्त मंडळींना मिळाली. त्यानंतर गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी येण्याचा आग्रह त्यांच्याकडून करण्यात आला. यावेळी शरद पवारांनी भिडे वाडयाची आणि मंदिर परिसराची बाहेरून पाहणी केली.

पवार यांनी मंदिरामध्ये जाण्याचं का टाळलं यासंदर्भात पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हणाले की, शरद पवारांनी मांसाहारी जेवण केल्याने ते मंदिरामध्ये गेले नाहीत. चुकीचा पायंडा पडता कामा नये, असे त्यांनी मला सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *