Breaking News

विशेष बातमी

आणि महाविकास आघाडीने भाजपाला बेसावध ठेवत केला गेम अध्यक्ष निवडीतील दुरूस्ती विधेयक बहुमताने मंजूर

मराठी ई-बातम्या टीम मागील आठ महिन्यापासून विधानसभा अध्यक्षाचे पद रिक्त असून या पदासाठी या हिवाळी अधिवेशनातच निवडणूक होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. त्यानंतर ही निवडणूक फार क्लिष्ट न करता आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी घेत तशी दुरूस्ती कायद्यात करण्याचा निर्णय घेत तसा प्रस्ताव विधिमंडळात मांडला. …

Read More »

मुखपट्टीवरून अजित पवारांनी सभागृहातच सर्वपक्षांच्या आमदारांना झापले रात्रीच्या लॉकडाऊनला गांभीर्याने विचार

मराठी ई-बातम्या टीम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिध्द आहेत. भले की ते एखाद्या सभेत बोलत असतील किंवा पक्षाच्या कार्यक्रमात जे मनात आहे ते स्पष्ट बोलून मोकळे होतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे साऱ्यांचेच लक्ष असते. अजित पवारांच्या याच स्वभाव वैशिष्ट्याचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबरोबर सर्वच पक्षिय आमदारांना आला. …

Read More »

फडणवीस म्हणाले, अन, मी बसलो असतो तर बोट बुडाली असती सभागृहात फडणवीसांच्या कोटीने हस्यकल्लोळ

मराठी ई-बातम्या टीम हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावावर बोलण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. मात्र बोलण्याच्या ओघात मी बसलो असतो तर बोटं बुडाली असती असा किस्सा सांगत प्रत्येक जिल्ह्यात एक उपसमिती असते पण या उपसमितीने अद्याप बोट खरेदीला का मान्यता दिली नाही असा सवाल केला. …

Read More »

शक्ती कायदा विधेयकात या आहेत तरतूदी, महिलांवरही होणार तक्रार दाखल खोटी तक्रार, बलात्काराच्या गुन्ह्यास मृत्यूदंड, अ‍ॅसिड हल्लेखोराला १५ वर्षांचा कारावास आदी प्रकरणी कारावास

मराठी ई-बातम्या टीम राज्यात महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी नव्याने सुधारीत शक्ती कायदा आणण्यात येणार आहे. या कायद्यात अत्याचार करणाऱ्या पुरूषाला कडक शिक्षेची तरतूद करण्यात आलेली असली तरी एखाद्या महिलेने अत्याचाराची खोटी तक्रार दिल्यास सकदर महिलेवरही गुन्हा दाखल करून तिला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याची महत्वपूर्ण तरतूद या विधेयकात कऱण्यात आली आहे. सदरचे …

Read More »

सरकारी चहापानाला मुख्यमंत्रीच गैरहजर मुख्यमंत्री न फिरकल्याने आदित्य ठाकरेंनाच मंत्र्यांकडून विचारणा

मराठी ई-बातम्या टीम जवळपास दिड महिने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आजारापणामुळे सरकारच्या दैंनदिन कामकाजातून बाजूला झालेले आहेत. मात्र किमान हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने तरी प्रथा आणि परंपरेनुसार मुख्यमंत्री हे आयोजित चहापानाच्या कार्यक्रमाला हजर राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली असतानाच राज्याचे आणि सरकारचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनीच सरकारी चहापानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र निर्माण …

Read More »

राज्य सरकार आणि कामगार बोर्डाची मान्यता न घेताच दिले कंत्राटदाराला कोट्यावधी रूपये नाव बांधकाम कामगारांचे आणि साडेतेरा कोटी रूपये खाजगी कंपनीचे

मराठी ई-बातम्या टीम कोविड काळात राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मदत सहाय्य निधी वाटपाचा निर्णय राज्य सरकाराने घेतला. परंतु या पैसे वाटपासाठी राज्य सरकार आणि कामगार कल्याण मंडळाची मान्यता न घेताच बांधकाम आणि इतर कामगार विभागाच्या मुख्याधिकाऱ्यांनी (MBOCWW) आणि मंत्रालयातील एका उपसचिवाने परस्पर एका खाजगी कंपनीची नियुक्ती करत बांधकाम कामगारांना पैसे …

Read More »

देशातल्या पहिल्या सहकार परिषदेला काँग्रेसला निमंत्रण पण पवारांना नाही केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांचा आजपासून महाराष्ट्र दौरा

मराठी ई-बातम्या टीम देशातील पहिली सहकार परिषद पहिले केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील प्रवरानगर लोणी येथे देशातील पहिली सहकार परिषद होत आहे. या परिषदेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, चंद्रकांत पाटील, राज्य सहकारी …

Read More »

भाजपा आमदार सुरेश धस यांच्या घोटाळ्याची ईडी आणि एसआयटी मार्फत चौकशी बीड जिल्ह्यात ४५० एकर जमीन परस्पर विकली: धस व निकटवर्तीयांचा १००० कोटींचा घोटाळा

मराठी ई-बातम्या टीम बीड जिल्ह्यातील देवस्थळ (मंदिरे) आणि वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनीच्या बेकायदेशीर हस्तांतरणाच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. माजी राज्य, महसूल मंत्री आणि भाजपाचे आमदार सुरेश धस आणि त्यांचे निकटवर्तीय यांनी खुल्या बाजारात देवस्थान व वक्फच्या १००० कोटींच्या बेकायदेशीर मालमत्ता विक्री केल्यातील …

Read More »

राज्यात बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी, नेमके काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय? पेटा कायद्याचे पालन करण्याबाबत आदेश

मराठी ई-बातम्या टीम मागील चार वर्षापासून न्यायालयाच्या निर्देशामुळे बंद असलेली बैलगाडा शर्यत आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पुन्हा एकदा सुरु होण्यास मान्यता मिळाली. पंरतु आता या शर्यतीस सशर्त परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. शर्यतीमध्ये प्राण्यांबरोबर निर्दयी वर्तन न करण्याचे निर्देश देत या शर्यती prevention of cruelty to animal act कायद्यांतर्गत …

Read More »

सहकार कायद्यातील “या” सुधारणांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता सदस्य पात्रता, सभेच्या कालावधीबाबत सहकार कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा

मराठी ई-बातम्या टीम सहकार कायद्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. ९७ व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने सहकार कायद्यात सन २०१३ मध्ये विविध कलमात सुधारणा करण्यात आल्या होत्या. या सुधारणा केल्यामुळे राज्यातील सहकारी क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला असल्याचे निदर्शनास येत …

Read More »