Breaking News

फडणवीस म्हणाले, अन, मी बसलो असतो तर बोट बुडाली असती सभागृहात फडणवीसांच्या कोटीने हस्यकल्लोळ

मराठी ई-बातम्या टीम

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावावर बोलण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. मात्र बोलण्याच्या ओघात मी बसलो असतो तर बोटं बुडाली असती असा किस्सा सांगत प्रत्येक जिल्ह्यात एक उपसमिती असते पण या उपसमितीने अद्याप बोट खरेदीला का मान्यता दिली नाही असा सवाल केला. परंतु फडणवीसांनी स्वतःच्याच वजनावर केलेल्या कोटीमुळे अल्पकाळ हास्यकल्लोळ उडाला.

विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना फडणवीसांनी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढत आरोग्य विभागाच्या आणि म्हाडा परिक्षेच्या पेपरफुटीवरून या विभागाच्या दोन्ही मंत्र्यांना लक्ष करत ब्लॅक लिस्टेड असलेल्या न्यासा या कंपनीला का कंत्राट दिले असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केले. याशिवाय राज्याच्या परिक्षा विभागाचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या सहभागाबद्दल त्यांनी भाष्य करत आता पर्यंत पोलिसांनी केलेल्या चौकशीचे फडणवीसांनी कौतुक केले.

त्यानंतर कोकणात आलेल्या पुराची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर तेथे पुरेशा बोटींची आणि सर्व साधणांनी युक्त अशा बोटीच नसल्याची बाब लक्षात आली. त्या दौऱ्या दरम्यान आम्ही बोटींनी फिरण्याचे ठरविले. परंतु त्या बोटींची अवस्था बघितल्यानंतर वाटले की जर मी त्या बोटीत बसलो असतो तर बोटच बुडाली असती असा सांगत काही काळ पॉज घेतला, त्यांनी पॉज घेतल्याबरोबर विधान सभेतील इतर सदस्यांनी फडणवीसांनी केलेल्या स्वतःच्या वजनावरील कोटीवरून एकच हस्यकल्लोळ निर्माण झाला. परंतु फडणवीसांननीही लगेच त्यामुळे मी काही त्या बोटीत बसलो नाही. मात्र नाना भाऊ बसून बोटीने गेल्याचे आवर्जून सांगितले.

तसेच या बोटी कधी खरेदी करणार असा सवाल उपस्थित करत केंद्राने मदत निधी देवूनही त्याचे अद्याप वाटप करण्यात आलेले नसल्याचा दाव करत शेतकऱ्यांनाही अवकाळी पावसामुळे आणि आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असतानाही त्यांना पुरेशी मदत दिली गेली नाही. यामुळे अनेक शेतकरी पुन्हा एकदा आत्महत्या करत असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *