Breaking News

कतारमध्ये भारतीयांच्या फाशीच्या शिक्षेमागे हमासचा संबंध? इस्रायलशी असलेल्या मैत्रीची शिक्षा भारताला भोगावी लागणार

कतारमध्ये भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कतारने या अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा जामीन अर्ज अनेकवेळा फेटाळण्यात आला. कतारच्या न्यायालयाने गुरुवारी या आठही जणांना फाशीची शिक्षा सुनावली असून लवकरच त्यांना फाशी देण्यात येणार आहे.

हा आदेश आल्यानंतर दिल्लीत एकचं गोंधळाचे वातावरण निर्माण झालेआहे. कतारच्या या निर्णयावर भारताने संताप व्यक्त केला आहे. परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ कतारच्या या निर्णयाला हमासशी जोडत आहेत. इस्रायल-हमास युद्धात कतार पूर्णपणे हमासला पाठिंबा देत आहे, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. भारत नेहमीच दहशतवादाच्या विरोधात उभा राहिला आहे.

७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्याला भारताने कडाडून विरोध केला होता, जो हमास आणि त्याचा सहानुभूतीदार देश कतारला फारसा पटला नाही. कतारच्या या निर्णयामागे सुनियोजित कारस्थान असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. इस्रायल-हमास युद्धात कतारला इस्रायलविरुद्धच्या प्रत्येक संधीचे भांडवल करून पाहतोय. अशा स्थितीत भारतीयांना फाशीची शिक्षाही अशा वेळी आली जेव्हा भारताने संपूर्ण जगासमोर हमासला विरोध केला.

तर दुसरीकडे कतारचा दावा आहे की भारतीय नौदलाचे माजी अधिकारी इस्रायलसाठी कतारच्या गुप्त पाणबुडी कार्यक्रमाची माहिती कथितपणे मिळवत होते. गुप्त माहिती इस्रायलला दिली जात असल्याचा आरोप आहे. यामुळेच आठ जणांना कतारने अटक केली होती. अटक केलेल्यांपैकी पूर्णेंदू तिवारी या स्थलांतरिताला माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडून सर्वोच्च सन्मान पुरस्कारही मिळाला आहे.

Check Also

भ्रष्टाचारप्रकरणी अब्जाधीश महिलेला व्हिएतनाममध्ये थेट फाशीची शिक्षा

व्हिएतनामी रिअल इस्टेट उद्योजिका ट्रुओंग माय लॅन याला देशाच्या सर्वात मोठ्या फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात हो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *