Breaking News

झेंडूच्या फुलांनी दसरा गोड होण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले दिवाळीला झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा

झेंडूच्या उत्पादनाने दसरा, दिवाळी सुखात जाईल, या आशेवर शेतकऱ्यांनी दुष्काळात थोड्याफार उपलब्ध पाण्यावर फूलशेती जगवली होती. मात्र, फुलांना मिळत असलेल्या कवडीमोल भावाने उत्पादन खर्चही निघणे आता मुश्किल झाले आहे.दसऱ्यात झेंडूच्या फुलांना २० ते ३० रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. जर हाच भाव कायम राहिला तर दिवाळी गोड होण्याची शक्यता कमीच आहे.

दसऱ्याला घर, बंगला ते लहान मोठी दुकाने, शोरूम, वाहनांना झेंडू फुलांची तोरणे लावतात. नवरात्रीत देवदेवतांच्या प्रतिमा, मुर्तीनांही याच फुलांचे हार घालतात. त्यामुळे नवरात्रीत व दसऱ्याला झेंडूला मोठी मागणी असते.ही बाब हेरून दरवर्षी अनेक शेतकरी झेंडू फुलांची लागवड करतात. सणासुदीला दोन पैसे जास्त हाती येतील, दसरा आनंदात साजरा करता येईल, ही शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, इतर पिकांप्रमाणेच झेंडूनेदेखील यंदा निराशा केली.

मात्र कमी दराने फुले विकावी लागली. शेवटी झेंडूची फुले घरी नेऊनही त्याचा काहीच फायदा नसल्याने विक्रेत्यांनी तो जागीच टाकून काढता पाय घेतला. अनेकांनी तो कचऱ्यात फेकून दिला. अपुऱ्या पावसाने मालाचा दर्जा घसरला आवक वाढल्याने भावही घसरल्यामुळे यंदा झेंडूनेदेखील निराशाच केली.अनेक शेतकऱ्यांचा फुले घेऊन येण्याचा वाहनाचा खर्चही वसूल झाला नाही, तर काहींना येण्याजाण्याचा खर्च भागून दोन दिवस जेवणाचा खर्च भागेल एवढेच उत्पन्न झेंडू फुले विक्रीतून मिळाले

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *