Breaking News

आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे विसरला तर करा हे काम आधार कार्डला लिंक केलेला नंबर विसरला; वाचा खाली दिलेला लेख

सध्या आधार कार्ड खुप महत्वपूर्ण बनले असून अनेक केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांसाठी महत्वपूर्ण आहे. आता सर्वात महत्त्वपूर्ण आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड स्वीकालं जातं. बँक अकाउंट ओपन करण्यापासून ते मुलांच्या शाळेमध्ये अॅडमिशन, घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करणे आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही आधार कार्ड अत्यंत गरजेचं असतं.

सुरक्षेच्या हिशोबाने आधारसोबत तुमचा मोबाईल लिंक असणे खूप गरजेचे आहे. मात्र अनेक लोकांना माहिती नसतं की, त्यांचा कोणता मोबाईल नंबर आधारसोबत लिंक आहे.जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे एक किंवा अधिक मोबाइल नंबर असतात तेव्हा हे घडते. त्यांना लक्षात राहत नाही की, त्यांनी कोणता नंबर आधारशी लिंक केला होता. आधार कार्ड बनवताना मोबाईल क्रमांकही टाकावा लागतो.

समला तुम्ही नंतर नंबर बदलला असेल, तर तुम्ही आधार कार्डमध्ये नवीन नंबर देखील अपडेट करू शकता. आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक कामांसाठी, ओटीपी आवश्यक आहे, जो फक्त आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर येतो. तुमचा कोणता नंबर आधारशी जोडला गेला आहे हे तुम्हालाही माहीत नसेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. ते तुम्ही घरी बसल्या ऑनलाइन सहज शोधू शकता.

चला जाणून घेऊया प्रोसेस…

-आधार च्या (UIDAI) च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.

-येथे My Aadhaar सेक्शनवर क्लिक करा.

-येथे Aadhaar Service ऑप्शनवर जा.

-Aadhaar Service मध्ये Verify an Aadhaar Number वर क्लिक करा.

-आपला १२ नंबरचा आधार नंबर टाका.

-Captcha कोड व्यवस्थित टाका.

-आता Proceed to Verify वर क्लिक करा.

-असे केल्याने, आधारशी लिंक केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे तीन नंबर दिसतील.

-जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर नंबर येथे दिसणार नाहीत.

Check Also

अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. भारत निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *