Breaking News

परकीय चलन साठा २.३६३ अब्ज डॉलरच्या घसरणीसह ५८३.५३ अब्ज डॉलरवर आरबीआयने जाहिर केली आकडेवारी

देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. आरबीआयने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २० ऑक्टोबर २०२३ रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा २.३६३ अब्ज डॉलरने घसरून ५८३.५३ अब्ज डॉलर झाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला परकीय चलनाचा साठा ५८५.८९ अब्ज डॉलर होता.

बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी परकीय चलनाच्या साठ्याची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, २० ऑक्टोबर रोजी विदेशी चलन मालमत्तेत मोठी घसरण दिसून आली आहे. विदेशी चलन संपत्ती ४.४४९ अब्ज डॉलरने घसरून ५१५.२०२ अब्ज डॉलर
झाली.

आरबीआयच्या सोन्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. अलीकडच्या काळात, मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी केली आहे, सोन्याच्या किमती वाढल्यामुळे, आरबीआयचा सोन्याचा साठा ४५.४२ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला आहे. SDR 72 दशलक्ष डॉलरच्या घसरणीसह १७.९२ बिलियन डॉलरवर आला आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये जमा असलेला साठा ८ दशलक्ष डॉलर्सने वाढून ४.९८ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.

पश्चिम आशियातील इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धानंतर जागतिक राजकीय तणाव वाढला आहे. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारात घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतली आहे. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे साठ्यात घट निर्माण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपयात घसरण होत आहे. मात्र, शुक्रवार २७ ऑक्टोबर रोजी दर स्थिर राहिले. एका डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.२४ रुपयांवर बंद झाला आहे. गेल्या आठवड्यात रुपया ११ पैशांनी कमजोर झाला आहे.

Check Also

बायजूसने वार्षिक शुल्कात केली ३०-४० टक्के कपात विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देणार इन्सेटीव्ह

एडटेक कंपनी थिंक अँड लर्न, प्रख्यात बायजू ब्रँडची मूळ कंपनी, अलीकडेच अहवालानुसार, अभ्यासक्रम सदस्यता शुल्क …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *