Breaking News

अखेर राज्यातील २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर ११२ तालुक्यात गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम दुष्काळ सरकारकडून जाहीर

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून ११२ तालुक्यात गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला. यासंदर्भात राज्याच्या महसूल विभागाने शासनादेश जारी केला आहे.
राज्यात ३५५ तालुके असून यापैकी सांगली जिल्ह्यातील जत, कवठे-महांकाळ, खानापूर, आटपाडी, तासगांव तर सातारा जिल्ह्यातील माण- दहिवडी, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मालशिरस, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट, मोहोळ, द.सोलापूर या तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
तसेच पालघर जिल्ह्यातील पालघर, तलासरी, विक्रमगड, धुळ्यातील धुळे आणि सिंदखेड, जळगांव जिल्ह्यातील अंमळनेर, भडगांव, भुसावळ बोधवड चाळीसगांव, चोपडा, जळगांव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर आणि यावल या तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला.
त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा,नवापूर हे तीन तालुके, नाशिक जिल्ह्यातील बागलान, मालेगांव, नांदगांव, सिन्नर हे चार तालुके, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, अहमदनगर आणि नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, राहुरी, संगमनेर, शेवगांव, श्रीगोंदा आणि जामखेड, औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगांव, वैजापूर आणि कन्नड, बीड जिल्ह्यातील आष्टी, धारूर, गेवराई, बीड, माझलगांव, शिरूर (कासार), वडवणी, अंबेजोगाई, केज, परळी व पाटोदा या तालुक्यातही गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
तसेच जालना जिल्ह्यातील अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद, जालना आणि परतूर, तर नांदेड जिल्ह्यातील मुखेड व देगलूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर वाशी, भूम, परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी आणि सेलू, हिंगोली जिल्ह्यातील सेनगावं, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव, लोणार, नांदूरा, संग्रामपूर शेगांव, मलकापूर आणि सिंदखेड राजा, यवतमाळ जिल्ह्यातील बाभळगांव, दारव्हा, कळंब, महागांव, उमेरखेड आणि राळेगांव, तर चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, नागपूर जिल्ह्यातील काटोल व कळमेश्वर तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
मध्यम दुष्काळाचे जिल्हे आणि तालुके
वर्धा -२, सातारा-२, नागपूर-१, चंद्रपूर-४, यवतमाळ-३, वाशिम-रिसोड, बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
अमरावती-४, अकोला- ५, लातूर-१, हिंगोली-१, नांदेड-१, नाशिक-४, नंदूरबार-१, धुळेमधील शिरपूर, पुणे जिल्ह्यातील आंबेगांव, पुरंदर, सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर-घोडनंदी या तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला.
दुष्काळ व्यवस्थापन संहिता-२०१६ नुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे मुल्यांकन करण्याबाबत संदर्भाधीन शासन निर्णय १ अन्वये सविस्तवर कार्यपद्धती विहीत करण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाची तूट आणि पिकांचे झालेले नुकसान याच्या आधारे जाहीर करण्यात आला आहे.

Check Also

भ्रष्टाचारप्रकरणी अब्जाधीश महिलेला व्हिएतनाममध्ये थेट फाशीची शिक्षा

व्हिएतनामी रिअल इस्टेट उद्योजिका ट्रुओंग माय लॅन याला देशाच्या सर्वात मोठ्या फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात हो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *