Breaking News

तळीरामांसाठी खुशखबर: बीअर, दारू, वाईन आता घरपोच मिळणार ऑनलाईन विक्रीस राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील महसूलात भर घालणाऱ्या दारू विक्रीला ऑनलाईन पध्दतीने विक्रीस परवानगी दिली असून आता घरबसल्या तळीरामांना दारू मिळणार आहे. कोरोनाच्या भीतीमुळे सुरु करण्यात आलेली दुकाने बंद करण्यात आली होती. मात्र  आता ऑनलाईन विक्रीस परवानगी दिल्याने तळीरामांची तहान आणि सरकारला महसूल या दोन्ही गोष्टी आता साध्य होणार आहे.
दारूची ऑनलाईन विक्री करण्यासाठी संबधित परवानाधारक दुकानांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच घरपोच दारू पोहोचविणाऱ्या व्यक्तीने तोंडाला ममास्क बांधणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र वाईन, बीअर आणि दारू ही एखाद्या व्यक्तीने त्यांची नोंदणी केली असेल तरच त्यास ती वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अर्थात सदरच्या व्यक्तीने दुकानदाराकडे ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *