Breaking News

विधिमंडळ आणि परिसरात आमदारांच्या वर्तनासाठी जारी केली ही आचारसंहिता विधिमंडळ आणि परिसरात आमदारांच्या वर्तनासाठी जारी केली ही आचारसंहिता

मराठी ई-बातम्या टीम

अधिवेशन काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात ट्विटर युध्द झाले. तसेच राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून मांजराचा आवास काढला. याशिवाय विधानसभा कामकाजाच्यावेळी भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याने विधानसभेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे अखेर विधिमंडळ आणि परिसरात वावरताना आमदारांनी आपल्या वर्तनाचे भान ठेवावे यादृष्टीने एक आचारसंहिता विधिमंडळाच्यावतीने आज जारी करण्यात आली. तसेच या पुस्तकीचे वाटपही सर्व आमदारांना वाटप करण्यात आले. त्यातील महत्वाच्या तरतूदी खालीलप्रमाणे…

अशी आहे आचारसंहिताः-

-सभागृहात उपस्थित असताना सदस्याने कामकाजाशी संबधित बाबींवरच लक्ष केंद्रीत करावे. सभागृहाच्या कामकाजाशी संबधित नसलेले वृत्तपत्र वाचण्यास मनाई करण्यात आले.

-त्याचबरोबर सभागृहात उपस्थित असताना सदस्याने एखाद्या पुस्तकातील मजकूर वाचून आणि तो इतर सदस्यांजवळ जाऊन त्यांना दाखवून कामकाजात व्यत्यय आणू नये.

-कामकाजावेळी आपापसात विनोद करू नये.

-कामकाजावेळी आपापसात बोलू नये मात्र शक्य असल्यास हळू आवाजात बोलावे.

-सदस्यांनी एकमेकांवर ओरडू नये.

-सभागृहात घोषणा देणे संसगीय सभ्याचाराशी सुसंगत नाही.

-सभागृहात घोरणे निषिध्द आहे.

व्यत्यय-अडथळाः-

-औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्याच्या खेरीज एखाद्या सदस्याला दुसऱ्या सदस्याचे भाषण सुरु असताना भाषण करणाऱ्याच्या अनुमतीशिवाय व्यत्यय आणण्याचा हक्क नाही.

-भाषण करताना इतर सदस्य भाषणात अडथळे आणत असतील तर सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याकडून अडथळ्याच्या नोंदी काढून टाकण्याचे निर्देश दिले जावू शकतात.

बेशिस्त वर्तणूकः-

-कामकाजात अडथळा आणण्याच्या उद्देशाने पीठासीन अधिकारी यांच्या आसानाजवळ जाणे आणि पीठासीन अधिकारी यांचा माईक ताब्यात घएण्याचा प्रयत्न करणे.

-सभागृहातील बाकावर उभे राहण्यास मनाई.

-एकाचवेळी दोन सदस्यांनी बोलण्यास उभे राहू नये.

– जेव्हा सदस्य लॉबीत असतील तेव्हा त्यांनी आपल्या हसण्याचा अथवा बोलण्याचा आवाज सभागृहात ऐकायला येणार नाही याची दक्षता घ्यावी.

-संघटीत स्वरूपात इतर सदस्यांनासभागृहात प्रवेश करण्यापासून लॉबीत रोखणे औचित्याला धरून नाही.

-एखाद्या सदस्याने पादत्राण हातात घेवून दुसऱ्या सदस्यास धमकावणे आक्षेपार्ह वर्तन.

-सदस्यांना सभागृहात धुम्रपान करणे, हॅट, ओव्हरकोट घालण्यास मनाई.

पीठासीन अधिकाऱ्यांप्रती आदरः-

-पीठासीन अधिकाऱ्यांप्रती योग्य आदर दाखविला पाहिजे.

-पीठासीन अधिकारी बोलण्यासाठी किंवा वैयक्तिक स्पष्टीकरण देण्यासाठी उभे असतील तर उभा असलेल्या सदस्यांनी जागेवर बसावे.

-पीठासीन अधिकाऱ्यांच्या आसनाकडे पाठ करून उभे अथवा बसून राहू नये.

-सदस्य त्यांना बोलू न दिल्याच्या विरोधात विशिष्ट पवित्रा घेऊन उभा राहू शकत नाही.

– निषेध व्यक्त करण्यासाठी कोणत्याही सदस्याने पीठासीन अधिकाऱ्याकडे धाव घेवू नये.

-पीठासीन अधिकारी बोलण्यासाठी उभे असताना सदस्यांनी सभागृहात इकडून तिकडे जावू नये, फिरू नये, उभे राहू नये, सभागृहात प्रवेश करू नये किंवा बाहेर जावू नये.

-पीठासीन अधिकाऱी यांच्या आसनासमोरून किंवा सभागृहाच्या एका बाजूकडून दूसरीकडे जावू नये.

-भाषण करताना पीठासीन अधिकाऱ्यांना उद्देशून असावे कोणाही व्यक्तीगत सदस्याला उद्देशून नसावे.

-पीठासीन अधिकाऱी यांनी दिलेल्या निर्णयावर सभागृहात वा सभागृहाबाहेर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे टीका करू नये.

सभागृहाची प्रतिष्ठाः-

-मंत्र्यांनी सभागृहामध्ये बोलत असतानाआपल्या जागेवरूनच अधिकारी गॅलरीतील अधिकाऱ्यांचासल्ला घेणे औचित्याला धरून नाही.

-मंत्र्यांव्यतीरिक्त इतर सदस्यांनी अधिकारी गॅलरीतील अधिकाऱ्यांकडून सल्ला घेणे औचित्याला धरून नाही.

-गॅलरीकडे पाहून बोलू नये किंवा त्याचा संदर्भ देवू नये.

-गॅलरीमधील अभ्यागतांचा उल्लेख करू नये.

-हरकत नोंदविताना सभागृहात कागदपत्रे फाडू नयेत.

सभागृहातील धरणेः-

-कोणत्याही सदस्याने सभागृहात धरणे धरू नये आणि सभागृहाच्या हौद्यात घोषणाबाजी करू नये.

-सदस्यांना त्यांना दिलेल्या निश्चित जागेवर उभ रहात नाहीत आणि पीठासीन अधिकाऱ्याचे लक्ष वेधत नाहीत किंवा त्यांच्या गटाकडून नाव पाठविण्यात आलेले असेल किंवा पीठासीन अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय बोलण्याची अनुमती देऊ शकणार नाही.

-पीठासीन अधिकारी यांनी बोलण्याची परवानगी दिली नसतानाही जर सदस्य बोलत असेल किंवा भाषण आवरते घेण्याचे निर्देश देऊनही ते बोलत राहिल्यास यथास्थिती असे भाषण किंवा त्या संबधीचा मजकूर कार्यवाहीचा भाग होणार नाही असे पीठासीन अधिकारी आदेश देवू शकतात.

दुसऱ्या सदस्याचे भाषण किंवा वर्तणूकीचा संदर्भ देणेः-

-न्यायालयात सिध्द होत नाही तोपर्यंत किंवा सभागगृह अन्यायी ठरवत नाही तो पर्यंत एखादा सदस्य दुसऱ्या सदस्यांच्या वर्तणुकीबाबतचा संदर्भ देणार नाही.

-सदस्यांनी, इतर सदस्यांवर दोषारोप ठेवू नये.

-सदस्यास अवहेलनापूर्वक नामनिर्देशित सदस्य म्हणून संबोधणे अनुज्ञेय नाही.

-सदस्याने सभागृहात उपस्थित सदस्यांना संबोधून बोलू नये, अध्यक्ष-सभापती यांच्या माध्यमातूनच इतर सदस्यांच्या बाबतीत भाष्य करावे.

असंसदीय शब्द- शब्दप्रयोग मागे घेणेः-

-कोणत्याही सदस्याने असंसदीय भाषेचा वापर केल्यावर लवकरात लवकर अशा भाषेकडे सभापती-अध्यक्षांचे लक्ष वेधावे.

-अध्यक्ष-सभापती यांनी एखादा विशिष्ट शब्द किंवा शब्द प्रयोग असंसदीय असल्याचा निर्णय देतात तेव्हा अशा शब्द प्रयोगावर कोणतीही चर्चा उपस्थित न करता तातडीने मागे घ्यावेत.

-अध्यक्ष-सभापती यांनी शब्द किंवा शब्दप्रयोग आक्षेपार्ह असल्याचा निर्णय दिल्ानंतर एखाद्या सदस्याने असा शब्द-शब्दप्रयोग मागे घेण्यास नकार दिला तर त्या सदस्यास बाहेर जाण्यास सांगण्यात येवू शकते. तसेच त्याने सदर आदेशाचे पालन करण्यास नकार दिला तर त्यास निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला जावू शकतो.

सभापती-अध्यक्ष यांवर आक्षेप घेणेः-

-सदस्यांनी सभापती-अध्यक्ष यांच्यावर आक्षेप घेवू नयेत.

-सभापती-अध्यक्ष यांच्याप्रती अपमानास्पद शब्दप्रयोगाचा वापर करू नये किंवा त्यांच्या हेतूविषयी प्रश्न उपस्थित करू नये.

राष्ट्रपती-राज्यपालांच्या नावाचा उल्लेख करणे किंवा आक्षेप घेणेः-

-सदस्यांनी चर्चेदरम्यान राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या नावाचा उल्लेख करू नये.

-राज्यांचे मंत्री, राज्य विधान मंडळे किंवा राज्यांचे राज्यपाल यांचेविरूध्द आरोप करणे अयोग्य आहे.

आचारसंहितेतील वरील महत्वाचे नियम खास विधिमंडळाच्या दोन्ही विधान परिषद आणि विधानसभेतील सदस्यांसाठी तयार करण्यात आले आहेत. आता विधिमंडळाने घालून दिलेल्या आचारसंहिता नियमांचे आमदारांकडून किती पालन होते हे लवकरच आगामी अधिवेशनात दिसून येईल.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *