Breaking News

नागरिकत्व कायदा विरोधी नागपूर, मालेगांव, मुंबईत मोर्चे दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, लखनौमध्ये दगडफेक जाळपोळ, प.बंगालमध्ये भव्य रॅली

नागपूर/मुंबई/ मालेगांव- प्रतिनिधी
नुकत्याच केंद्र सरकारने मंजुर केलेल्या नागरीकत्व कायद्याला दिवसेंदिवस विरोध होत असून सुरुवातीला दिल्ली आणि पश्चिम बंगालपर्यंत असलेले विरोधाचे लोण आता मुंबईसह महाराष्ट्रात आणि लखनौमध्ये पसरत चालले आहे. नागपूर आणि मालेगाव येथे या कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. तर मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नागरीकत्व कायद्यामुळे राज्यघटनेच्या मुळ ढाच्याला धक्का पोहोचत आहे. तसेच हा कायदा मुस्लिम समाजाच्या विरोधात असल्याची भावना सर्वत्र पसरल्याने महाराष्ट्रासह देशभरातील सर्वधर्मनिरपेक्षवादी नागरीकांच्या आणि विविध संघटनांच्यावतीने ठिकठिकाणी मोर्चे, निदर्शने काढण्यात येत आहेत.
या कायद्याच्या विरोधात सर्वात आधी दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी निदर्शने करत आंदोलन केले. त्यानंतर प.बंगालमध्ये तीव्र निदर्शने करत त्याचे शासकिय वाहनांवर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. त्यापाठोपाठ मुंबईही मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत या कायद्यास विरोध केला. तर काल बुधवारी सोलापूरात सर्वधर्मिय आणि सर्वपक्षिय मोर्चा काढत निदर्शने करण्यात आली.
नागपूरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने मुस्लिम समुदायाच्यावतीने विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला. तर उत्तर प्रदेशात लखनौ येथे या कायद्याविरोधात पोलिसांवर दगडफेक करत काही ठिकाणी वाहने जाळण्याच्या घटना घडत आहेत. मालेगांवातही मोर्चाचे आयोजन करत या कायद्याला विरोध दर्शविला.
नवी दिल्लीत या कायद्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरु असल्याने आज काही भागात बंद पुकारण्यात आला. तर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारकडून येथील इंटरनेट सेवा बंद केली आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *