Breaking News

वायुदलाचे २३५ जवान गिरविणार एमटीडीसीच्या स्कुबा डायव्हींग केंद्रात धडे

व्यवस्थापकिय संचालक अभिमन्यु काळे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

संरक्षण दलात महत्वाची कामगिरी बजाविणाऱ्या वायु दलाने त्यांच्या अधिकारी स्कुबा डायव्हींगचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्य सरकाऱच्या अखत्यारीत असलेल्या एमटीडीसी अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या स्कुबा डायव्हींग केंद्राची निवड केली. देशातील इतर राज्यांमधील स्कुबा डायव्हींग केंद्राऐवजी एमटीडीसीच्या केंद्राची निवड वायु दलाने केल्याने राज्याच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला असल्याची माहिती एमटीडीसीची व्यवस्थापकिय संचालक अभिमन्यु काळे यांनी दिली.

मंत्रालयातयातील वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एमटीडीसीचे इंडियन इस्टीट्युट ऑफ स्कुबा डायव्हींग अँण्ड अँक्वाटीक स्पोर्टंस (आयआयएसडीए)  हे स्कुबा डायव्हींगचे प्रशिक्षण केंद्र आहे. वायु दलाचे जवळपास २३५ अधिकाऱ्यांना या केंद्रात स्कुबा डायव्हींगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची सुरुवात ३ जानेवारी २०१९ पासून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 या प्रशिक्षण केंद्रात पर्यटकांनाही प्रशिक्षण देण्यात येते. मागील १० वर्षापासून हे केंद्र सुरु असून जवळपास १ हजार पर्यटकांना याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्राला जगभरात मान्यता असल्याची माहिती आयआयएसडीएचे मुख्य प्रशिक्षक डॉ. सारंग कुलकर्णी यांनी दिली.  

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *