Breaking News

अटल महोत्‍सवात “आय अँग्री” एकांकिका सर्वप्रथम

तरूणाईच्‍या प्रचंड उत्‍साहात अटल महोत्‍साची सांगता

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई भाजप आणि महाराष्‍ट्र एकता अभियान यांच्‍यातर्फे आयोजित अटल महोत्‍सवातील एकांकिका स्‍पर्धेत पुण्‍याच्‍या आमचे आम्‍ही पुणे या संस्‍थेच्‍या “आय अॅग्री” या एकांकिकेने प्रथम तर डोंबिवलीच्‍या स्‍वामी नाटयांगन या संस्‍थेच्‍या “बिफोर द लाईन या दुसरे तर गंधर्व  कलाधार या संस्‍थेच्‍या “रेनबोवाला” या एकांकिेकेने तिस-या क्रमांकाचे पारितोषीक पटकावले. तर सिध्‍दार्थ अविरत या संस्‍थेच्‍या “देव हरवला” या एकांकिकेला उत्‍तेजनार्थ पारितोषिक देण्‍यात आले.

भारतरत्‍न अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या प्रथम जयंती निमित्‍ताने मुंबई भाजप आणि उपाध्‍यक्ष मिलिंद तुळसकर यांच्‍या महाराष्‍ट्र एकता अ‍भियान या संस्‍थेतर्फे अटल महोत्‍सवाचे २५ ते २८ डिसेंबर या दरम्‍यान आयोजन करण्‍यात आले होते. यामध्‍ये वत्‍कृत्‍व स्‍पर्धेसह आरोहण २०१८ ही खुली राज्‍यस्‍थरीय एकांकिका स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली होती. यामध्‍ये राज्‍यभरातून २८ एकांकिका सादर करण्‍यात आल्‍या. त्‍यांची प्रथम फेरि रंविद्र नाटयमंदिर येथे पार पडली. तर २८ डिसेंबरला दामोदर हॉल परळ येथे अंतिम फेरी घेण्‍यात आली. अंतिम फेरिमध्‍ये एकुण ६ सहा एकांकिका निवडण्‍यात आल्‍या होत्‍या. यावेळी मुबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या हस्‍ते प्रथम फेरितील बक्षिसे देण्‍यात आली. एकांकिका महोत्‍सवाला मिळालेल्‍या प्रतिसादाबाबत आयोजक मिलिंद तुळसकर यांचे आमदार अॅड आशिष शेलार यांनी कौतूक केले. तर स्‍व अटल बिहारी वाजपेयी यांचे मराठी नाटकांशी एक वेगळे नाते होते. ते जेव्‍हा जेव्‍हा मुंबईत यायचे त्‍या त्‍यावेळी मराठी नाटक हमखास पहायचे अशा आठवणी सांगतानाच आमदार अॅड आशिष शेलार यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे मुंबई आणि महाराष्‍ट्रातील संस्‍कृतीशी असलेले ऋणानुबंध् आपल्‍या भाषणात सांगितले.

या अटल मोहत्‍सावाच्‍या निमित्‍ताने सुमारे ६०० कलाकर सहभागी झाले. तरुणाईच्‍या सळसळत्‍या उत्‍साहात हा महोत्‍सव पार पडला. विशेषः काल २८ डिसेंबर रोजी दामोदर येथे झालेल्‍या अंतिम फेरिला तरूणाईने चांगलीच गर्दी केली. रात्री बारा वाजता झालेल्‍या बक्षिस वितरणालाही तेवढीच गर्दी पहायला मिळाली.  रात्री उशिरा प्रसिध्‍द लेखक देवेंद्र पेम यांच्‍या हस्‍ते विजेत्‍यांना गौरविण्‍यात आले. यावेळी नाटय निर्माते व अभिनेते प्रदिप कबरे व दिग्‍दर्शक हेमंत भालेकर यांनी अंतिम फेरिचे परिक्षक म्‍हणून काम पाहिले. प्रथम आलेल्‍या एकांकिकेला ३० हजार रुपये रोख स्‍मृतीचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र तर दुस-या आलेल्‍या एकांकिकेला २० हजार रुपये तर तिस-या एकांकिकेला १० हजार रोख स्‍मृतीचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र देण्‍यात आली. या शिवाय नेपथ्‍य, प्रकाश, उत्‍कृष्‍ठ अभिनेता, अभिनेत्री, दिग्‍दर्शक, लेखक अशी वैयक्तिक बक्षिेसेही देण्‍यात आली. महोत्‍सवादरम्‍यान रेल्‍वे कामगार संघटना, भाजपा पदाधिकारी, लेखक, कवी यांचीही भेट देऊन स्‍पर्धकांचा उत्‍साह वाढविला.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *