Breaking News

ऐन मतदानाच्या रणधुमाळीत फडणवीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये रंगल्या कोट्या फडणवीस म्हणाले काँग्रेसची मते फुटलीत

राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेचेही निवडणूकीत महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये काँटे की टक्कर होणार हे स्पष्ट झाले. यापार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेने आपल्या पक्षांच्या आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवत यावेळी काहीही करून विजय मिळविण्याच्यादृष्टीने रणनीती राखली गेली. यापार्श्वभूमीवर आज मतदानाच्या दिवशीच भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, मंत्री सतेज बंटी पाटील अचानकरित्या विधानभवनात समोरासमोर आले. यावेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडत म्हणाले की, आम्हाला कळलंय काँग्रेसची तीन मते फुटली असल्याचे सांगत काँग्रेसच्या नेत्यावर कोटी करत खळबळ माजविण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्यावर काँग्रेसनेही चांगलेच प्रत्युत्तर देत फडणवीसांच्या कोटीवर तितकेच जोरदार उत्तर दिले.

एकीकडे प्रत्येक मतासाठी सत्ताधारी आणि विरोधक संघर्ष करत असतानाच दुसरीकडे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास विधानभवानामध्ये खरोखर हे चित्र पहायला मिळाले. दोन्हीकडून विजयाचे दावे केले जात आहेत. मात्र ऐनवेळी काही मते फिरली तरी निकाल पालटू शकतो याची सर्वांनाच जाणीव आहे. त्यामुळे प्रत्येक आमदारावर मागील काही दिवसांपासून लक्ष ठेवलं जात होते. शिवाय आजही विधानभवनाच्या परिसरामध्ये नेते मंडळी आणि मंत्री आमदारांना मतदानासंदर्भातील सूचनांबरोबरच सल्लेही देताना दिसत होते. एकंदरीतच विधानसभेच्या आवारामध्ये आज सकाळपासूनच तणावपूर्ण वातावरण आणि मतदानासंदर्भातील उत्सुकतेमुळे एक प्रकारची शांतता प्राकर्षाने जाणवत होती.
मात्र एका क्षणी विधानसभेच्या लॉबीमध्ये भाजपा आणि काँग्रेसचे आमदार समोरसमोर उभे ठाकले आणि फडणवीसांनी ही संधी साधत एक भन्नाट शाब्दिक फटका लगावला. विशेष म्हणजे यावर काँग्रेसच्या आमदारांनीही तितकेच भन्नाट उत्तरं दिले.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे या निवडणुकीतील उमेदवार असणाऱ्या प्रवीण दरेकर, प्रशांत बंब या आमदारांसहीत लॉबीमधून चालत होते. त्याचवेळी समोरुन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज पाटील आले. विरोधी पक्षातील आमदारांना समोरुन येताना पाहून फडणवीसांनी एक मजेदार वक्तव्य केलं. हात जोडून काँग्रेसच्या तिन्ही आमदारांकडे पाहत फडणवीसांनी, आम्हाला कळलं तीन मतदार फुटले असं म्हटलं. फडणवीसांचं हे वाक्य ऐकून थोरात, चव्हाण आणि पाटील हसू लागले. पाटील यांनी लगेच तो मी नव्हेच म्हटलं. त्यावर फडणवीसांनी, “अरे हा, तो नाही,” असं म्हणत उत्तर दिलं आणि पाटील यांची पाठ थोपटली आणि सारेच जण हसू लागले. सध्या या साऱ्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक मराठी वृत्तवाहिन्यांवरही या लॉबीमधील गप्पा सकाळपासूनच चर्चेचा विषय ठरत आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *