Breaking News

राज ठाकरे यांची प्रकृती स्थिर, लीलावतीत झाली शस्त्रक्रिया रविवारची शस्त्रक्रिया मंगळवारी

मागील महिन्यात पुण्यात आयोजित सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः जाहिर करत आपल्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे पुढील महिना दोन महिने भेट होणार नसल्याचे जाहिर केले होते. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया जवळपास दोन ते तीन वेळा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आज अखेर राज ठाकरे यांच्यावरील हिप बोनवरील शस्त्रक्रिया लीलावती रूग्णालयात करण्यात आल्याची माहिती मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिली.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावर आज सकाळी लीलावती रुग्णालयात यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली. लीलावती रुग्णालयातील ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली. राज ठाकरे यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

खरंतर, राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून काल मुंबईत महाआरती आणि पूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मनसेच्या महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेतर्फे गणेश मंदिर आणि हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजनही करण्यात आलं होतं.

दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि अयोध्या दौरा यामुळे राज ठाकरे चर्चेत आले होते. मात्र उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदाराने राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला. उत्तर प्रदेशमध्ये यायचे असेल तर अगोदर उत्तर भारतीयांची माफी मागा अशी मागणी या भाजपा खासदाराने केली होती. त्यानंतर माझा दौरा अयशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली, असा आरोप करत राज ठाकरे यांनी करत अयोध्या दौरा रद्द केला होता.

राज ठाकरे यांच्यावर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शस्त्रक्रिया होणार होती. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांच्यावरली शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर त्यांच्या सर्व चाचण्या करण्यात पुन्हा काही दिवस गेले. त्यानंतर रविवारी राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. मात्र आज अखेर शस्त्रक्रिया झाली.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *