Breaking News

छगन भुजबळ म्हणाले, सध्या दोनच दाढी एक पांढरी दाढी अन् काळी दाढी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काढला चिमटा

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. आज दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारने मंजूर केलेले जीएसटी विधेयक विधानसभेतही मंजूर करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटी विधेयक मांडले. त्यावरील चर्चेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून चिमटा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना केली.

सत्ताधारी आणि विरोधकांच्या सहमतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जीएसटीचे सुधारीत विधेयक विधानसभेत सादर केले. या विधेयकावरील आपली भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे उभे राहिले. त्यावर सुरुवातीलाच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याचा आनंद आपल्याला झाला आहे. मात्र तो आनंद आपला वेगळाच आहे. सध्या दिल्लीत तुमचे वजन फारच वाढले असल्याची चर्चा कानी येत आहे. त्यामुळे सध्या दोनच दाढी चर्चेत असल्याचे सांगत भुजबळ यांनी हळूच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला.

त्या दोन दाढी म्हणजे एक काळी दाढी आणि दुसरी दाढी. तुमच्या काळी दाढीची सध्या चलती आहे. तर दुसरी दाढी म्हणजे पांढरी दाढी असे सांगत त्या पांढऱ्या दाढीची सध्या देशभरात चलती आहे. पण अजून तुमची दाढी काळी आहे. त्यामुळे तुम्हालाही संधी आहे असा टोला लगावत राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दाढीवाला मुख्यमंत्री झाल्याचा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.

सध्या तुम्ही अन्न धान्यावर जीएसटी लावताय. केंद्र सरकारने जे कायदे पास केले ते सर्व कायदे राज्यातही मंजूर करून घेताय. मात्र या निर्णयामुळे सर्वसामान्य माणूस महागाईच्या ओझ्याखाली दबून चालला आहे असे सांगत तुमचे काय उद्या भाषणावरही तुम्ही जीएसटी लावाल असा खोटच टोला भाजपाला लगावला.

त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भुजबळांच्या भाषणातील हाच मुद्दा पकडत म्हणाले, भुजबळसाहेब भाषणावरही जीएसटी लागण्या अगोदर तुम्ही आधी बोलून घ्या अशी कोपरखळी भुजबळांना लगावली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *