Breaking News

छगन भुजबळ म्हणाले, अहो आमदारांची गाडी तरी सोडा ना ओ सुरक्षा यंत्रणांवरून भुजबळांनी मांडली सभागृहात कैफियत

हिवाळी अधिवेशन नागपूरात होत आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून नागपूर शहर थंडीने गारठले असतानाच राज्याचे राजकिय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विरोधकांनी सीमावादावरून आणि कर्नाटक सरकारचे बेळगावात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच घेरले. मात्र सुरक्षा यंत्रणांकडून आमदारांच्या वाहनांना जाऊ दिले जात नसल्याचा मुद्दा छगन भुजबळ यांनी उपस्थित करत आमदारांची कैफियत मांडली.

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या अधिवेशनात पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “निदान आमदारांची गाडी तरी सोडा ना ओ”, असं म्हणत छगन भुजबळांनी झालेला त्रास सांगितला. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भुजबळ यांना आश्वासित केलं.

छगन भुजबळ म्हणाले, रिझर्व्ह बँकेच्या जवळील रस्ता बंद करण्यात आला आहे. तेथे आम्हाला दुसरीकडून या असं सांगतात. त्यामुळे अर्धा तास वाहतूक कोंडीतून विधिमंडळात यावं लागतं. जागोजागी अडवणूक होत आहे. आमदारांना तिथून यायचं आहे, निदान आमदारांची गाडी तरी सोडा ना ओ अशी मागणी केली.

यावेळी भुजबळांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर एक ठराव मांडून तो एकमताने मंजुर करण्याचीही मागणी केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बेळगाव-कारवारविषयी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. आता त्यांचं म्हणणं सभागृहाचं म्हणणं आहे हे सांगण्यासाठी त्यांनी या अधिवेशनात त्यावर एक ठराव मांडावा आणि सगळ्यांनी तो एकमताने मंजुर करावा.

भुजबळांनी अधिवेशनातच आमदारांच्या गाड्या अडवल्या जात असल्याची तक्रार केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भुजबळ यांना या प्रकरणी वाहतूक पोलिसांना सूचना केल्या जातील असं आश्वासन दिले.

दरम्यान, कर्नाटकने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतरही बेळगांवात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांची धरपकड सुरु करत १४४ कलम लागू केले. यापार्श्वभूमीवर विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच धारेवर धरल्याचे चित्र दिसले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *