Breaking News

Tag Archives: border issue

महागाईमुळे थंडावलेला आंतरराष्ट्रीय व्यापार पुन्हा उभारी घेण्याचा अंदाज जागतिक व्यापार संघटनेची अपेक्षा

मागील काही वर्षात आंतरराष्ट्रीयस्तरावर असलेली आर्थिक अनिश्चितता आणि दोन देशातील सीमाप्रश्नावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर महागाईत मोट्या प्रमाणावर वाढ झाली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात एकप्रकारचे थंडावलेपण आले होते. परंतु जागतिक व्यापार संघटनेने (WTO) आशावादी दृष्टिकोन देत २०२४ मध्ये जागतिक व्यापार दृष्टिकोनासाठी आपला अंदाज जारी केला. अहवालानुसार, २०२५ साठी …

Read More »

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी लोकांबद्ल जशी आग ओकली त्याला प्रतिउत्तरच नाही भारतीय जनता पक्षाची भूमिका सीमाप्रश्नीही नेहमीप्रमाणे संदिग्धच-नाना पटोले

सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटक सरकारने टार्गेट करत त्यांच्यावर अत्याचार केले, त्यांच्या गाड्या फोडल्या. महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबर बैठक झाल्यानंतरही कर्नाटकाने कुरापती थांबवल्या नाहीत. महाराष्ट्रातील मंत्री सीमाभागात जाऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती असताना सभागृहात ठराव मांडताना कर्नाटक सरकारला खडेबोल सुनवायला पाहिजे होते. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी लोकांबद्दल ज्याप्रमाणे आग ओकली, …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, सीमावर्ती भाग केंद्रशासित करा मराठी भाषिकांच्या पाठीशी सर्वपक्षियांनी खंबीरपणे उभे रहावे !

निपाणी, बेळगाव आणि कारवार असा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र सीमावाद प्रश्न सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत हा विषय प्रलंबित आहे, तोपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित होण्याविषयी ठराव करायला हवा. सर्व पक्षांनी मराठी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत आज सोमवारी केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री …

Read More »

जयंत पाटील यांची खोचक टीका, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री साप चावल्यासारखे गप्प आता तरी मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांनी नेभळटपणा सोडून मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध ठराव मांडावा

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ‘बेळगावसह सर्व सीमांचे रक्षण करून महाराष्ट्र राज्याने तयार केलेल्या बेळगाव वादाचा निषेध करण्याचा ठराव’ करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री साप चावल्याप्रमाणे गप्प बसले आहेत अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला एक इंचही जमिन देणार नसल्याचे वक्तव्य केले. …

Read More »

अजित पवार यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा, न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने… कर्नाटकाला एक इंच देखील जागा देणार नाही

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल कर्नाटकात बोलत असताना महाराष्ट्राला एक इंचही जमिन देणार नसल्याची भूमिका जाहिरपणे मांडत महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका मांडली. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना इशारा दिला. अजित पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची आपण वाट पहात …

Read More »

‘प्रती सभागृह’ उभे करत महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार निदर्शने...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव एकमताने मंजूर करायला तयार आहोत. त्यामुळे तो ठराव घ्या अशी विनंती करण्यात आली होती, परंतु आज आठवडा संपतोय तरीही त्यांनी तो ठराव …

Read More »

नाना पटोलेंची टीका, कर्नाटक सरकारच्या दादागिरीवर ईडी सरकारची अळीमिळी गुपचिळी केंद्र सरकार व भाजपाच्या आशिर्वादानेच कर्नाटक सरकारची दंडेली..

महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही अशा वल्गना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई करत आहेत. सीमावाद प्रश्नी कर्नाटक सरकार दररोज दादागिरी करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यानंतरही कर्नाटककडून जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या विरोधात गरळ ओकली जात आहे. पण कर्नाटकच्या या दादागिरीसमोर राज्यातील ईडी सरकार मात्र अळिमिळी गुपचिळी आहे, अशी टीका …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आता त्याच भाषेत उत्तर… हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा जयंत पाटील यांनी सभागृहात केला उपस्थित...

सीमाभागातील मराठी माणसांवर पाळत ठेवली जात आहे, जाणीवपूर्वक मराठी माणसाला त्रास दिला जातो आहे. याचा आपण जाब विचारला पाहिजे, कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलत आहेत त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला पाहिजे अशा शब्दात माजी मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारला ठणकावून सांगितले. यांना जर मस्ती चढली असेल तर आपणही कोयना, …

Read More »

अंबादास दानवेंच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार खंबीरपणे उभे मराठी भाषिकांच्या पाठीशी सरकार

सीमावर्ती भागातील गावे आणि मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे आणि पूर्ण ताकदीने उभे आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच सर्वं सीमावर्ती भागातील गावांच्या विकासासाठी एक विशेष कार्यक्रम राज्य शासन हाती घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सीमावर्ती भागातील घडामोडींच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित …

Read More »

अंबादास दानवे म्हणाले, कर्नाटकला ईट का जवाब पत्थर से… मराठी बांधवांच्या संरक्षणासाठी सरकारने खंबीर भूमिका घेणे गरजेचे

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करूनही कर्नाटक सरकार दुटप्पी भूमिका अवलंबत आहे. त्यामुळे आता मराठी बांधवांच्या संरक्षणासाठी सरकारने खंबीर भूमिका घेतली पाहिजे, कर्नाटकला ईट का जवाब पत्थर से देण्याची गरज आहे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली. आज महाराष्ट्र बेळगाव एकीकरण समितीने आयोजित मोर्च्यात सहभागी झालेल्या …

Read More »