Breaking News

शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा गौप्यस्फोट, मोदींनी राणेंना दिली समज पीएला काढून टाका नाही तर मंत्रीपद काढून घेईन

भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यातील राजकिय शत्रुत्व सर्वश्रुत आहे. त्यातच आज शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे असलेल्या पीएने अनेकांना गंडा घातल्याने त्या पीएला काढून टाकण्याची समज दिल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.

त्या पीएला आधी हाकला नाहीतर तुमचं मंत्रिपद काढून घेणार, असा इशारा दिल्याचा दावा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला.

कणकवली इथं नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हजर होते. यावेळी राऊत यांनी दिल्लीतील या गोष्टीचा मोठा खुलासा केला.

‘नारायण राणेंकडे असलेल्या पीएने या मंत्रालयाच्या माध्यमातून अनेकांना गंडे घातले. पंतप्रधान मोदींना हे जेव्हा कळले तेव्हा त्यांनी राणेंना समज दिली. त्या पीएला आधी हाकला नाहीतर तुमचं मंत्रिपद काढून घेणार, असा इशारा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मागच्या अधिवेशनामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर दिले होते. या प्रकारानंतर राणे लोकसभेची पायरी चढायचेच विसरले. राणे अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासालाही उपस्थित राहत नाहीत, अशी खोचक टीकाही शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेवर केली.

मध्यल्या काळात त्यांनी एक पीए ठेवला होता. या पीएची काम ही फक्त पटवापटवीची होती. अनेकांना त्याने गंडा घातला. मोदी साहेबांच्या हे लक्षात आलं. त्यावेळी, या पीएला आधी हाकलून द्या, नाहीतर मंत्रिपद काढून घेईन, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंना झापलं होतं, असा खुलासा विनायक राऊत यांनी केला.

लोकसभेत सर्व मंत्री हजर होते. वेगवेगळ्या मुद्यावर सर्वजण बोलत होते. आता या महाशयांना धड बोलता येत नाही. मालवणीही नीट बोलता येत नाही. मराठीचा तर पत्ता नाही. फडणवीस या शब्दाचा उच्चार तर करताही येत नाही. दक्षिणेतील एका खासदारने केरळमध्ये कोरोनाच्या काळात लघु उद्योग खात्यातून काय रोजगार देणार, काय उपाययोजना करणार असा प्रश्न विचारला, त्यावर राणे उभे राहिले, आम्हाला वाटलं चांगलं उत्तर देतील, पण प्रश्न होता केरळचा आणि उत्तर दिलं तामिळनाडूचं, तेव्हापासून हे महाशय सभागृहात येत नाही. अधिवेशनाच्या काळात सुद्धा उभे राहिले नाही. MSEM चा फुलफॉर्म काय आहे, हे एकदा तरी सांगा, अशी खिल्लीही विनायक राऊत यांनी उडवली.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *