Breaking News

१५ ऑगस्टला ध्वजारोहण करण्यासाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस जाणार या जिल्ह्यांमध्ये… धनंजय मुंडे आणि धर्मराव आत्राम वगळता राष्ट्रवादीचे बहुतांष मंत्री विदर्भात

देशाचा ७६ वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाचे महत्व जाणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संबधित पालकमंत्र्याने ध्वजारोहण करावे अशी प्रथा आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अद्यापही पुरेशा मंत्र्यांची वाणवा आहे. त्या पार्श्वभूमीवर ३६ जिल्ह्यांपैकी २८ जिल्ह्यांतील ध्वजारोहणासाठी २८ मंत्र्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या मंत्र्यांच्या यादीमध्ये अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांपैकी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातच आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव आत्राम हे गडचिरोलीतच ध्वजारोहण करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर येथे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे अमरावती, दिलीपराव वळसे-पाटील हे वाशिमला, हसन मुश्रीफ हे सोलापूर येथे तर संजय बनसोडे हे लातूर येथे तर अनिल पाटील हे बुलढाणा येथे, आदिती तटकरे हे पालघर येथे ध्वाजारोहण करणार आहेत.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर येथे, सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर येथे, चंद्रकांत पाटील हे पुणे येथे, राधाकृष्ण विखे-पाटील हे अहमदनगर, गिरिष महाजन हे नाशिक येथे, रविंद्र चव्हाण हे ठाणे येथे, अतुल सावे हे परभणी येथे, सुरेश खाडे हे सांगली येथे, मंगल प्रभात लोढा हे मुंबई उपनगर येथे ध्वजारोहण करणार आहेत.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मंत्रालयात ध्वजारोहण करणार असून त्यांच्या गटाचे संदीपान भुमरे हे औरंगाबाद येथे, अब्दुल सत्तार हे जालना येथे, संजय राठोड हे यवतमाळ येथे, तानाजी सावंत हे उस्मानाबाद येथे, शंभूराज देसाई हे सातारा येथे, विजयकुमार गावित हे नंदूरबार येथे, उदय सामंत हे रत्नागिरी येथे, दिपक केसरकर हे सिंधूदूर्ग येथे, गुलाबराव पाटील हे जळगांव येथे, दादाजी भुसे हे धुळे येथे असे मिळून २८ जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून ध्वाजारोहण करणार आहेत. तर उर्वरित रायगड, हिंगोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, अकोला, नांदेड जिल्ह्यात तेथील जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत.

 

ध्वजारोहणासाठी खालील मंत्र्यांची यादी….

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार राज्य निवडणूक आयोगाचे आवाहन

ग्रामपंचायत निवडणुकांतील सर्व उमेदवार ट्रू व्होटर ॲपबरोबरच आता पारंपरिक पद्धतीनेदेखील (ऑफलाइन) निवडणूक खर्चाचा हिशेब सादर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *