Breaking News

प्रकाश आंबेडकर यांची टीका, मविआतील नेत्यांमध्येच ताळमेळ नाही

महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणताच ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात आपण काँग्रेसच्या नेत्यांना सांगितले होते. पण त्यांचा नेता इथे नसल्याने त्यांना या संदर्भात निर्णय घेता आला नाही. परंतु मागील दोन तीन दिवसांपासून काँग्रेसकडून जो वार्तालाप होत आहे, आणि उद्धव ठाकरे यांच्याकडूनही होत आहे आहे. यावरून एकच दिसून येते की, ते एकमेकांवर निशाणा लावून बसले आहेत. रस्त्यावरची जशी भांडण असतात मी तुला दाखवतो अशा भाषेवर ते आता आले आहेत अशी बोचरी टीका करत मविआतील घटक पक्षांमध्ये ना ताळमेळ आहे ना ते एकत्र येतील असे भाकित वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले.

अकोला येथे आज बीड लोकसभा मतदारसंघातून अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. त्यावेळी वरील टीका केली.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काही जागांवर काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आहेत. पण एक अशी चर्चा सुरु आहे की, जो ज्या जिल्ह्याचा नेता आहे त्याला काँग्रेसबद्दल आणि पक्षाच्या उमेदवाराबाबत आत्मीयता नाही. पण प्रसारमाध्यमांचा आमच्यावर विश्वास नव्हता. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांवर विश्वास होता. पण आज दूध का दूध पाणी का पाणी समोर आले आहे. माझी प्रसारमाध्यमांना विनंती आहे की त्यांनी जी सत्य परिस्थिती आहे त्याचीच बातमी करावी असे आवाहनही यावेळी केले.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यामध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघात जी परिस्थिती निर्माण होत आहे. ती पाहता एकनाथ शिंदे यांचा उमेदवार आणि किशोर गजभिये यांच्यात सरळसरळ लढत होताना दिसत आहे. काँग्रेसचे तेथे काहीच दिसत नाही असेही यावेळी सांगितले.

वंचितवर सध्या होत असलेल्या आरोपांबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित एक मोठी राजकिय ताकद म्हणून पुढे येत आहे. निवडणूक मतमोजणी आधी सर्वोच्च न्यायालय ईव्हीएम मतमोजणीसोबत पेपर ट्रेल मोजणीला परवानगी देईल अशी अपेक्षा व्यक्त करत आजच्या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी पूर्ण मतदारसंघात मोठी ताकद म्हणून उभी रहात आहे. तसेच लोकसभा निवडणूकीत चांगली परिस्थिती निर्माण करू अशा आशा आहे असेही यावेळी सांगितले.

Check Also

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *