Breaking News

प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींना सल्ला, यश मिळालं नाही तर एक पाऊल मागे…

सध्या देशभरात सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीत जर काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही तर राहुल गांधी यांनी एक पाऊल मागे घेण्याचा निश्चित विचार करावा असा सल्ला भाजपाचे आणि नीतीशकुमार यांचे राजकिय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्याचे वृत्त द टाईम्स ऑफ इंडियाने पीटीआयच्या हवाल्याने दिले आहे.

यावेळी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, मागील जवळपास दशकभरात काँग्रेस पक्षाच्या जो जनाधार होता जी प्रतिमा होती ती राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली परत मिळवता आली नाही. तसेच राहुल गांधी हे मागील १० वर्षात काँग्रेसला आलेल्या पराभवाची कारणीमीमांसा करण्यास करण्यास कोणालाही परवानगी देत नाहीत. त्यामुळे माझ्यादृष्टीने हे असे कृत्य लोकशाही वादी असल्याचे मला तर दिसून येत नाही.

काही वर्षांपूर्वी प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या रणनीतीबाबत काही उपाय सूचविले होते. परंतु प्रशांत किशोर यांच्याशी काँग्रेसचे सूर जुळले नसल्याने प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या गोटातून बाहेर पडले.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेबाबत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, काही नेत्यांनी स्वतःच्या नेतृत्वाच्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. काल परवा आलेल्यांकडून तुम्ही सल्ल्याची अपेक्षा करत प्रतिमा बदलासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त करता. वास्तविक पाहता नेतृत्वाने अभाव असलेल्या गोष्टी आणि स्वतःच व्यक्तीमत्व यातील एक प्रकारे पूलाची बांधणी गरजेचे असते. परंतु राहुल गांधी यांचा समज असा आहे की, त्यांना सर्व गोष्टी माहित आहेत. त्यामुळे ते त्यांना माहित असलेल्या गोष्टीची प्रभावीपणे मांडणी करण्यासाठी मदत घेत नाहीत.

प्रशांत किशोर यांनी यासाठी सोनिया गांधी यांचे उदाहरण देत म्हणाले की, राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर सोनिया गांधी याा भारतीय राजकारणात आल्या. परंतु त्यांनी १९९१ साली पी.व्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन करण्यास मंजूरी दिली. त्याचपध्दतीने राहुल गांधी राजकीय गोष्टींचा वापर करायला हवा. कोणत्याही नेत्यापेक्षा किंवा पक्षापेक्षा काँग्रेसकडे कार्यकर्त्याचं जाळ सर्वाधिक आहे. जर पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर राहुल गांधी यांनी स्वतःच्या वैयक्तिक आकांक्षा बाजूला ठेवल्या तर चांगले दिवस येतील आणि तेच फायद्याच राहिल.

काँग्रेसच्या पक्षांतर्गत रचनेवर बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, काँग्रेसमध्ये कोणताही आणि कितीही मोठा नेता असला तरी छोट्या छोट्या गोष्टींसाठी राहुल गांधी यांची परवानगी त्यांना हवी असते. तसेच राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेबद्दल पक्षातच विविध मते आहेत. तसेच राहुल गांधी यांनी त्यांच्या नेतृत्वात गुणात आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त करत आहेत.

प्रशांत किशोर पुढे बोलताना म्हणाले की, मागील काही काळात निवडणूक आयोग, न्यायपालिका, प्रसारमाध्यमांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे इलेक्टोरल बॉण्ड सारख्या महत्वाच्या विषयांवर कमी पडले. त्याचबरोबर काँग्रेस पक्षांतर्गत असलेल्या संघटनात्मक रचनेचाही काँग्रेसच्या आतापर्यंतच्या पराभवाला कारणीभूत ठरला आहे.

जर काँग्रेसने संघटनात्मक पुर्नबांधणी केली तर देशाच्या इतिहासात काँग्रेसची जी भूमिका राहिली आहे ती भूमिका आणि स्थिती पुन्हा मिळवू शकते असेही प्रशांत किशोर यांनी सांगत आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आल्यानंतर आम आदमी पार्टीने ज्या पध्दतीने आंदोलन सुरु केले आहे ते पाहता काँग्रेसला आम आदमी पार्टी हा पर्याय ठरण्याची शक्यता नाकरता येत नाही असेही सांगितले.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *