Breaking News

राजकारण

बीकेसीत शिंदेंच्या समर्थनार्थ ठाकरे कुटुंबिय, जयदेव ठाकरे म्हणाले, एकटे सोडू नका एकनाथ शिंदे याचे चार-पाच निर्णय आपल्याला आवडले

खरी शिवसेना कोणाची यावरून अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. त्याचा निकाल निवडणूक आयोगाच्या आधी आज ५ सप्टेंबर रोजी शिवसेना विरुद्ध शिंदे गटाने केलेल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जनतेच्या दरबारात लागेल. शिंदे गटाने बीकेसी मैदानावरील मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली. त्यातच आता या मेळाव्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे थोरले सुपुत्र जयदेव ठाकरे यांनी …

Read More »

एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही गद्दारी नाही तर गदर केलाय पण गद्दारी झाली… शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर

आम्ही गद्दारी केली नाही, तर गदर केलाय. गदर म्हणजे क्रांती. आम्ही गद्दार नाही, तर बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. ते आम्ही अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले. आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झालीय. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती …

Read More »

उध्दव ठाकरेंचे खुले आव्हान: हिंदूत्वावरून होऊनच जाऊ द्या, या एका व्यासपीठावर शिंदे गटासह भाजपालाही दिले आव्हान

माझी शस्त्रक्रिया झाला. माझी बोटंही हालत नव्हती. त्यावेळी ज्यांच्यावर जबाबदारी सोपविली. त्यांनीच गद्दारी करत पाठीत खंजीर खुपसला आणि ज्यांच्यावर लक्ष ठेवत होतो. त्यांनी मात्र सोबत केली. मी काँग्रेस, राष्ट्रीवादीसोबत आघाडी केली म्हणून मला हिंदूत्व सोडलं म्हणता. या एकदा हिंदूत्वावरून होवूनच जाऊ द्या तुम्ही सगळे जण एका व्यासपीठावर या असे खुले …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, माझ्या मात्या-पित्याची शपथ घेवून सांगतो ते तसंच आहे अमित शाह, नरेंद्र मोदी यांच्यासह बंडखोरांवर सोडले टीकास्त्र

काही दिवसांपूर्वी अमित शाह आले होते. ते म्हणाले आम्हाला जमिन दाखवायची आहे. मी तर म्हणतो खरेच दाखवाच आम्हाला जमिन. आम्ही जमिनीवरचेच आहोत. या इथे बघा असे सांगत अमित शाह म्हणतात तसे काही ठरले नव्हते. मी माझ्या मात्या-पित्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी जे सांगतोय ते तसेच …

Read More »

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी संघर्षाला घाबरत नाही, थकणार नाही… भगवान गडावरील दसरा मेळाव्यात आगामी निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचे संकेत

माझ्या अंगात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या छत्रपती शिवरायांचे संस्कार, भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचं रक्त आहे. मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, कधीही कुणासमोर झुकणार नाही असा निर्धार भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. भगवान भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुडे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर …

Read More »

रिपाई नेते जोगेंद्र कवाडे यांची घोषणा, काँग्रेस सोबतची आघाडी संपुष्टात पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय मेळाव्यात प्रा. कवाडे यांची घोषणा

गेल्या दिड दशकापासून काँग्रेस आघाडी मध्ये मित्रपक्ष म्हणून काँग्रेस पक्षाने सम्मानपूर्वक सत्तेत वाटा देत आपले राजकीय मित्रत्व जपून आघाडीचा धर्म पाळणे आवश्यक होते. परंतु तसे न करता पीपल्स रिपब्लिकन पक्षाची सातत्याने उपेक्षा करून जो विश्वासघात केले आहे. अशा काँग्रेसपक्षासोबत असलेली आघाडी संपुष्टात आणत असल्याची घोषणा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख प्रा. …

Read More »

दसऱ्याची रेल्वे कर्मचाऱ्यांना खुषखबर, दिवाळी बोनस देण्यास केंद्राची मंजूरी फक्त गॅझेटेड अधिकारी वगळता रेल्वे पोलिस आणि कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस

कोरोना काळात रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसपासून वंचित रहावे लागले होते. मात्र आता कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी झालेला असल्याने आणि केंद्र आणि राज्य सरकारनेही कोरोनाचे निर्बंध हटविण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती कोरोना पुर्व काळासारखी आता पुन्हा निर्माण होत आहे. तसेच आर्थिकसह अनेक गोष्टी पूर्व पदावर येत आहेत. त्याचबरोबर कोरोनानंतर पहिल्यांदाच …

Read More »

दिपक केसरकर म्हणाले, भाजपा आमच्यासाठी मोठं पद सोडू शकते तर आम्ही का नाही?

शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईतील अंधेरी विधानसभेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. या निवडणूकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यातील पहिली लिटमस टेस्ट होणार असल्याची चर्चा रंगली होती. तसेच अंधेरीचा जागा शिवसेनेची असल्याने त्यावर शिंदे गटाकडूनही दावा केला जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच ही निवडणूक शिंदे गटाकडून …

Read More »

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की विधानसभा …

Read More »

राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सरस्वती पूजन हे उशीरा सुचलेले शहाणपण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला असल्याने त्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयातील सरस्वती पूजन हे मनापासून झाले की, संपूर्ण राज्यातील हिंदू समाजाने टीका केल्यामुळे उशीरा सुचलेले शहाणपण आहे, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी …

Read More »