Breaking News

राजकारण

अजित पवार यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर, तर मी गुरूमंत्र देईन…

राज्यात सत्तांतरानंतर अगोदर विरोधकांकडून मंत्रिमंडळ विस्तारावरून आणि नंतर जिल्ह्यांना पालकमंत्री कधी मिळणार? असा प्रश्न करत विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात होती. अखेर काल (शनिवार) राज्य सरकारकडून राज्यभरातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक-दोन नाहीतर तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आल्याचे …

Read More »

अंबादास दानवे म्हणाले, एकनाथांच्या भूमीला गद्दार हा डाग लावला शिंदे-फडणवीस सरकार हे लूट करणारे सरकार

दोन तीन मंत्री हे संभाजीनगर जिल्ह्यात असून देखील अतिवृष्टीमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या यादीत मतदारसंघाचे नाव नाही हे खेदजनक असल्याचे म्हणत शिंदे फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बेरोजगारांच्या विरोधात असून लूट करणारे सरकार असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. आज पैठण येथे आयोजित मेळाव्यात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन …

Read More »

रोहित पवार यांचा सवाल, …तर बुलेट ट्रेनचा आग्रह का? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या त्या व्हिडीओचा आधार घेत केला सवाल

मागील काही वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजक्ट असलेल्या मुंबई-गुजरात दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनवरून सातत्याने विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. त्यातच या बुलेट ट्रेनला मुंबईतील स्थानकासाठी लागणारी जागाही महाविकास आघाडी सरकारने दिली नव्हती. आता संपूर्ण स्वदेशी बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस ही सुपर फास्ट ट्रेन महाराष्ट्र ते गुजरात दरम्यान धावणार …

Read More »

पालकमंत्री नियुक्तीवरून अजित पवार म्हणाले, माझ्या नाकीनऊ आलं होतं ते कसं… कसे सांभळणार सहा सहा जिल्हे

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री कधी मिळणार? हा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने विचारला जात होता. अखेर शनिवारी पालकमंत्र्यांची घोषणा झाली आहे. शिदे-फडणवीस सरकारमधील विविध नेत्यांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण देवेद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री म्हणून सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ

समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. माजी …

Read More »

नितीन गडकरी यांची घोषणा, सिकलसेल रूग्णांसाठी अर्ध्या किंमतीत उपचार वयोश्री योजनेच्या लाभातून कोणीही वंचित राहणार नाही : देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ नागरिक हे प्रत्येक पिढीचे वैभव असते. त्यांनी खस्ता खाल्ल्या म्हणून आजचे चांगले दिवस आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे जबाबदारी म्हणून ‘वयोश्री’ योजनेतील साहित्य वाटपातून कोणीही वृद्ध वंचित राहणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय व सक्षमीकरण …

Read More »

नवे पालकमंत्री जाहीर: मात्र बहुतांश जिल्हे भाजपा मंत्र्यांकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पार पडल्यानंतर आणि अधिवेशन काळात नैसर्गिक संकट असल्याने पालकमंत्री नेमा अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारकडे करण्यात येत होती. मात्र आता नैसर्गिक संकट काही प्रमाणात ओसरले असले तरी अद्यापही काही ठिकाणी पावसाची हजेरी आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आज उशीराने का होईना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची नियुक्त्या …

Read More »

पुण्यातील त्या घोषणेवरून मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा, असले नारे खपवून घेणार नाही.. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्यांना सोडणार नाही

पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या घटनेची दखल राज्य सरकार व गृहविभागाने गांभीर्याने घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “ज्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या त्यांना सोडणार नाही,” असं म्हणत गंभीर इशारा दिला आहे. तर, आता या गंभीर …

Read More »

मुख्यमंत्री पुत्राच्या त्या फोटोला प्रत्युत्तर देण्याच्या नादात शीतल म्हात्रे आल्या अडचणीत सुप्रिया सुळे यांचा मार्फिंग फोटो ट्विट केल्याने पोलिसात गुन्हा दाखल

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून काम करत असल्याचा फोटा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकिय कृत्याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे गटाच्या समर्थक शीतल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला मॉर्फिंग केलेला फोटो ट्विट …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, मग केंद्र सरकार त्या संघटनांवर बंदी का घालत नाही? पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करा

दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपाखाली एनआयए, ईडी या केंद्रीय यंत्रणांनी पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी करून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या अनेकांची धरपकड करताना पुण्यात काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या हे अत्यंत निषेधार्ह आहे. अशा घोषणा देणाऱ्या व दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणतीही संघटना धार्मिक …

Read More »