Breaking News

राजकारण

नाना पटोलेंचे आव्हान, सावरकरांना पेन्शन कशासाठी मिळत होती, फडणवीसांनी सांगावे फडणवीसांना त्या वक्तव्याने मिरच्या झोंबण्याचे काही कारण नाही

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कर्नाकटमध्ये एका पत्रकार परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सावरकर यांच्याविषयी जे विधान केले त्यावर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आकांडतांडव करण्याची काही गरज नाही. राहुल गांधी खरे तेच बोलले त्यात चुकीचे काय आहे? सावरकर व आरएसएसचे स्वातंत्र्य चळवळीत काडीचेही योगदान नाही. …

Read More »

राहुल गांधी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांचा उध्दव ठाकरेंना सवाल सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांचे समर्थन करणार का?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’ कर्नाटकात पोहचली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसला लक्ष्य केले. त्याचबरोबर ‘संघाने ब्रिटिशांना मदत केली, तर स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड अर्थात भत्ता घ्यायचे,’ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी यांनी केलेल्या …

Read More »

रात्रीचे आठ.. अन् मंत्रालयात आलेल्या सामान्य माणसाला भेटण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ जनतेची भेट घेतल्याशिवाय मंत्रालय सोडत नाही

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर अभ्यागतांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या सामान्य नागरीकाला आस असते ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची. मुख्यमंत्री देखील या जनतेची भेट घेतल्याशिवाय मंत्रालय सोडत नाही. काल, शुक्रवारी ७ ऑक्टोबरला रात्री साडेआठ पर्यंत मुख्यमंत्री शिंदे सामान्यांना भेट होते. योगायोगाने काल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शंभर …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, सिल्व्हर ओकवर हल्ला कुणी करायला लावला हे आता स्पष्ट

ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकवर हल्ला केला ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले गेले याचा अर्थ सिल्व्हर ओकवर जाण्यासाठी त्यांना कुणी फुस लावली होती हे लक्षात येते असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले होते. त्यावेळी १०५ एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार …

Read More »

नाशिक नांदूरनाका दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

नाशिक- नांदूरनाका येथे खाजगी बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला, प्रवेशात १५ टक्क्यांची वाढ

शालेय शिक्षणानंतर अभियांत्रिकी तंत्रशिक्षणातील पदविका हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ या वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मागील तीन वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये सलग १० टक्के होत असलेली वाढ यावर्षी १५ टक्के झाली आहे. या प्रवेशित विद्यार्थ्यांची …

Read More »

बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुषखबरः कामावर घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

एसटी महामंडळाच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत दीडशे इलेक्ट्रिक आणि मार्चपर्यंत एक हजार सीएनजी बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, एसटी संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महामंडळाला दिले. परिवहन विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन …

Read More »

रामदास कदम म्हणाले, आम्हाला १०० टक्के विश्वास धनुष्यबाण नाही मिळाला तर विचार करून पुढील दिशा ठरवू

शिवसेना कोणाची यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार संघर्ष सुरू आहे. आज शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचं या प्रकरणावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. शिंदे आणि ठाकरे गटाने आपआपली बाजू मांडल्यानंतर आयोग आपला निर्णय देईल. मात्र, निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यास काय? यावर शिंदे गटाचे नेते रामदास …

Read More »

निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे गटाला दिली उद्यापर्यंतची मुदत पक्ष आमच्या बाजुने; शिंदेच पक्षप्रमुख शिंदे गटाचा दावा

शिवसेना पक्ष कुणाचा? या प्रश्नी निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला परवानगी दिली. त्यानंतर निवडणूक आयोगाने ७ ऑक्टोंबरपर्यंत शिंदे गट आणि ठाकरे गटाला कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार कागद सादर कऱण्याची मुदत आज संपली. मात्र आपल्याला शिंदे गटाची कागदपत्रे मिळाली नसल्याचा दावा ठाकरे गटाने आयोगासमोर करत १५ …

Read More »

नारायण राणे यांचा आरोप, उध्दव ठाकरेंनी छोटा शकील आणि राजनला सुपारी दिली शिवसेना सोडल्यानंतर आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचा केला आरोप

शिवसेना सोडल्यानंतर मला ठार मारण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी छोटा शकील आणि छोटा राजन यांना सुपारी दिली होती असा खळबळजनक आरोप भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केला. तसेच मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करण्यास सदा सरवणकर यांना उध्दव ठाकरे यांनी सांगितले होते असा …

Read More »