Breaking News

राजकारण

पडळकर यांच्या वक्तव्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, भाजपाचा प्रयत्न नाही राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपाचा प्रयत्न नाही, नेतृत्वावरील नाराजीमुळे तो पक्ष स्वतःहून बुडेल

भाजपाचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. मात्र आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर लवकरच भाजपाचा झेंडा असणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या कार्यालयावरही भाजपाचा झेंडा लागणार असल्याचे वक्तव्य करून खळबळ माजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या वक्तव्याला काही तासांचा अवधी उलटत नाही तोच …

Read More »

काँग्रेस म्हणते, ७५ हजार नोकऱ्या म्हणजे ‘ऊंट के मुंह में जीरा’

केंद्रातील मोदी सरकार ७५ हजार जागांची नियुक्त पत्रे इच्छुक उमेदवारांना देत असल्याचा मोठा गाजावाजा करत आहे. परंतु यातील अनेक जागांच्या परीक्षा दीड दोन वर्षांपूर्वीच झालेल्या असून नियुत्या मात्र प्रलंबित ठेवण्यात आल्या होत्या. आता हिमाचल प्रदेश, गुजरात व इतर निवडणुका होत असल्याने भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर तरुणांची आठवण झाल्याने नरेंद्र मोदी व …

Read More »

अखेर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर, पहिले ठिकाण औरंगाबाद उद्या रविवार २३ ऑक्टोबर रोजी औरंगाबादेतील नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या भेटी घेणार

मुख्यमंत्री पदावर असताना शस्त्रक्रिया झाल्याने सर्वच सार्वजनिक कार्यक्रमातून प्रत्यक्ष हजेरी लावण्यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यातच शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतरही राज्याच्या दौऱ्यावर जाता आले नाही. अखेर अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी आणि मदतीचा हात देण्यासाठी अखेर तब्बल पाच महिन्यानंतर उध्दव ठाकरे हे मुंबईबाहेर पडणार असून …

Read More »

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणतात, मला फिरायचं असतं, वाय प्लस सुरक्षा द्या

तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून सुरक्षा व्यवस्था न पुराव्याचे प्रकरण ताजे असतानाच आता व शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षव्यवस्थेत वाढ करण्यात आली. तर मागील काही दिवसात उध्दव ठाकरे गटाच्या आमदार-खासदारांची सुरक्षा कमी करण्याचे प्रमाण वाढत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे पदूम आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपणास ऱाज्यभरात …

Read More »

देशातील पहिली ‘महाराष्ट्र स्थलांतर निरीक्षण प्रणाली’ महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन

स्थलांतरित गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांची अद्यावत माहिती तात्काळ एकाच प्रणालीवर उपलब्ध करणा-या देशातील पहिली ‘स्थलांतर निरीक्षण प्रणाली’चे महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महिला व बालविकास विभागाने देशातील पहिली महाराष्ट्र विकसित (महाराष्ट्र मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम) केली आहे. मंत्री लोढा म्हणाले की, विभागाने वैयक्तिक …

Read More »

जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी महिन्याभरात धोरण तयार करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

राज्यातील आठ जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी जलसंपदा विभाग आणि महानिर्मिती कंपनीने संयुक्तरित्या महिन्याभरात धोरण तयार करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महानिर्मिती कंपनीद्वारे नवीन जलविद्युत प्रकल्प उभारणे, जुन्या जलविद्युत प्रकल्पाचा पुनर्विकास करण्याबाबत आयोजित …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, ‘सारथी’च्या उपक्रमांसाठी शासन सर्वतोपरी मदत करणार

‘सारथी’च्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून विभागातील मराठा व मराठा -कुणबी समाजातील तरूणांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून तरूणांचे भविष्य घडविण्याऱ्या ‘सारथी’ला शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. छत्रपती शाहू महाराज, संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ‘सारथी’ पुणे या संस्थेच्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी …

Read More »

भाजपाचे आव्हान,.. तर उध्दव ठाकरे यांचा उमेदवार पळ काढेल

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लेखी पत्राद्वारे केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे तसे आवाहन केले. त्याचा विचार करून भाजपाने सहानुभूती म्हणून आपला उमेदवार मागे घेतला …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, देशभक्त मुस्लिम बांधव…एकत्र काम करू मराठी मुस्लिम सेवा संघाचा शिवसेनेला पाठिंबा

शिवसेनेतील फुटीनंतर विविध राजकिय पक्ष आणि सामजिक संघटनांकडून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भेटून शिवसेनेला पाठिंबा देण्यात येत आहे. तसेच आगामी काळातही शिवसेनेसोबत राहण्याचे ग्वाही या संघटनांकडून देण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुस्लिम सेवा संघाने आज मातोश्री या निवासस्थानी उध्दव ठाकरे यांना भेटून शिवसेनेला पाठिंबा दिला. यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिक्षण संस्थांचे महत्वपूर्ण योगदान शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणाद्वारे आदर्श पिढी घडविण्याचे काम करावे

शिक्षण हा शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून राज्याच्या शिक्षण विभागाचे काम पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने सुरू आहे. शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षकांनी देखील दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांची आदर्श पिढी घडविण्याचे काम करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर निकषांची पूर्तता करणाऱ्या सर्व माध्यमांच्या …

Read More »