Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले, देशभक्त मुस्लिम बांधव…एकत्र काम करू मराठी मुस्लिम सेवा संघाचा शिवसेनेला पाठिंबा

शिवसेनेतील फुटीनंतर विविध राजकिय पक्ष आणि सामजिक संघटनांकडून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भेटून शिवसेनेला पाठिंबा देण्यात येत आहे. तसेच आगामी काळातही शिवसेनेसोबत राहण्याचे ग्वाही या संघटनांकडून देण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुस्लिम सेवा संघाने आज मातोश्री या निवासस्थानी उध्दव ठाकरे यांना भेटून शिवसेनेला पाठिंबा दिला.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, देशभक्त मुस्लिम बांधव नेहमीच शिवसेनेच्या पाठिशी राहिले आहेत. तुम्ही बंधुत्वाच्या नात्याने आलात, पाठिंबा दर्शवलात त्याबद्दल आभार. आपण मराठी आहोत…एकत्र काम करू., असे आवाहन केले.

मुंबई, मराठवाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या मराठी मुस्लिम सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मराठी मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्राची अस्मिता, एकता आणि अखंडतेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानतानाच शिवसेनाही मराठी मुस्लिम बांधवांच्या पाठिशी कायम राहील अशी ग्वाही दिली.

मराठी मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष फरीर मोहम्मद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली यावेळी संघाच्या वतीने उद्धव ठाकरे यांना एक पत्र देण्यात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तत्वे आणि मूल्यांवर शिवसेना पक्षाची स्थापना केली.

आज देशामध्ये जातीधर्माचे राजकारण करून द्वेष पसरवणारे याच शिवसेनेला हिंदुत्व शिकवू लागले आहेत. पण उद्धव ठाकरे खरे हिंदुत्व जपले आहे अशा भावना यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी शिवसेना नेते अनंत गीते, खासदार अरविंद सावंत, संघाचे पदाधिकारी डॉ. ए. आर. खान, नुरुद्दीन नाईक, अख्तर शेख, इस्माईल समदुले, शब्बीर शेख, कॅप्टन अकबर खलापे आदी उपस्थित होते.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *