Breaking News

राजकारण

दिपक केसरकर म्हणाले, भाजपा आमच्यासाठी मोठं पद सोडू शकते तर आम्ही का नाही?

शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईतील अंधेरी विधानसभेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. या निवडणूकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यातील पहिली लिटमस टेस्ट होणार असल्याची चर्चा रंगली होती. तसेच अंधेरीचा जागा शिवसेनेची असल्याने त्यावर शिंदे गटाकडूनही दावा केला जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच ही निवडणूक शिंदे गटाकडून …

Read More »

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की विधानसभा …

Read More »

राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सरस्वती पूजन हे उशीरा सुचलेले शहाणपण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला असल्याने त्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयातील सरस्वती पूजन हे मनापासून झाले की, संपूर्ण राज्यातील हिंदू समाजाने टीका केल्यामुळे उशीरा सुचलेले शहाणपण आहे, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी …

Read More »

“या रे दसरा मेळाव्याला” शिंदे गटाने मोजले १० कोटी रूपये?

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर निर्बंध उठवून सार्वजानिक उत्सव धुमधडाक्यात साजरे झाले. त्यामधून जनमत आणि शक्ती प्रदर्शन करण्याचा धडाका सरकारने लावलेला दिसतो. याचाच एक भाग म्हणून आता दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून गर्दी जमा करण्यासाठी मोठी रस्सीखेच लागलेली …

Read More »

बीकेसी दसरा मेळाव्यावरील कोट्यवधींच्या उधळपट्टीची ईडी, आयकर विभागाने चौकशी करावी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी

दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने राज्यातील विविध भागातून एस टी बसेस तसेच खाजगी बससेमधून कार्यकर्ते आणले जात आहेत. यासाठी एसटी महामंडळाकडे १० कोटी रुपये रोख भरले असून ते मोजण्यासाठी महामंडळाला दोन दिवस लागले असे वृत्त माध्यमांमधून समजते. शिंदे गटाकडे एवढी मोठी रक्कम कोठून आली? त्यांना हा पैसा कोणी …

Read More »

नागपूर मेट्रोच्या वाढीव खर्चाच्या मान्यतेसह, कृष्णा आणि भंडाऱ्यातील उपसा सिंचनास मान्यता

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पोलिसांना इतर बँकाकडून कर्ज उपलब्ध करून देणे, रेशन कार्ड धारकांना १०० रूपयात दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू देण्याच्या निर्णयासह नागपूर मेट्रो उभारणीत झालेल्या ५९९ कोटी ६ लाख वाढीच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेच्या सुधारीत खर्चास आणि उस्मानाबाद-बीड मधील दुष्काळी तालुक्यातील कृष्णा संजीवनी …

Read More »

पोलिसांसाठी खुषखबर, पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. १० एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील पोलिसांना खाजगी बँकांकडून कर्ज घेऊन पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत योजना राबविण्यात येत होती. त्याप्रमाणे ५ हजार १७ पोलीस …

Read More »

निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना १०० रू.त दिवाळी भेट राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मुंबईसह राज्यातील १४ महापालिकांच्या निवडणूका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेत केलेल्या बंडखोरीमुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात अद्यापही रोष आहे. जनतेतील हो रोष कमी कऱण्याच्या उद्देशाने आणि आगामी निवडणूकीत शिंदे गटाला आणि भाजपाला निवडणूका सोप्या जाव्यात या उद्देशाने दसरा आणि दिवाळीचे औचित्य साधत राज्यातील १ कोटी ७० लाख रेशन कार्ड …

Read More »

‘वंदे मातरम्’ला विरोध करून काँग्रेसने देशविरोधी मानसिकता दाखवली भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे या राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करून काँग्रेसने आपली देशविरोधी मानसिकताच दाखवली आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. ‘वंदे मातरम्’ला विरोध करणारे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्र्य संग्रामात वंदे मातरम् …

Read More »

शरद पवार यांनी सांगितले, शिवसेनेला कधी मदत करणार ते

मागील दिवसांपासून शिवसेनेच्या फुटीर गटाला भाजपाने ज्या पध्दतीने उघडपणे मदत करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मात्र उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत करण्यात येत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यातच ठाकरे गटाचा आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा जवळ आलेला असतानाच अंधेरी विधानसभा पोट निवडणूकीचा कार्यक्रम आज …

Read More »