Breaking News

दिपक केसरकर म्हणाले, भाजपा आमच्यासाठी मोठं पद सोडू शकते तर आम्ही का नाही?

शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईतील अंधेरी विधानसभेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. या निवडणूकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यातील पहिली लिटमस टेस्ट होणार असल्याची चर्चा रंगली होती. तसेच अंधेरीचा जागा शिवसेनेची असल्याने त्यावर शिंदे गटाकडूनही दावा केला जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच ही निवडणूक शिंदे गटाकडून लढविण्यात येणार नसल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी अप्रत्यक्षरित्या सांगत जर भाजपा आमच्यासाठी मोठं पद सोडू शकते तर आम्ही एक जागा सोडू शकत नाही का? असे सांगत अंधेरी निवडणूकीबाबत शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली.

प्रसार माध्यमांच्या काही प्रतिनिधींशी दीपक केसरकर हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.

अंधेरी विधानसभेतील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेकरीता नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी यापूर्वीच या अंधेरी विधानसभा पोट निवडणूकीसाठी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. मात्र फुटीनंतर एकनाथ शिंदे गटाकडून हा जागेवरून भाजपाकडे दावा करणार का? याबाबत अटकळ बांधली जात होती.

तसेच भाजपाकडूनही या जागेसाठी मुरजी पटेल यांची उमेदवारी मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅड.आशिष शेलार यांनी यापूर्वीच जाहिर केली आहे. फक्त त्यावर भाजपाच्या केंद्रीय समितीकडून शिक्कामोर्तब होणे शिल्लक राहिले आहे.

यावेळी बोलताना दिपक केसरकर म्हणाले की, भाजपाने आमच्यासाठी मुख्यमंत्री पदासारखे महत्वाचे पद सोडले. तर त्यांच्यासाठी आम्ही एक जागा सोडू शकत नाही? असा प्रतिसवाल करत ही जागा भाजपाचीच असल्याचे सांगत या जागेसाठी आमचा भाजपाला पाठिंबा राहणार असल्याचेही सांगितले.

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि स्व.रमेश लटके यांच्या जवळचे संबध असल्याबाबत विचारले असता केसरकर म्हणाले, त्यांच्या कुटुंबियांना समजायला पाहिजे की आपण कोणासोबत जायचे ते. जवळचे संबध तर होतेच. त्यामुळे त्या जर आमच्यासोबत आल्या असत्या तर त्यांचा विचार झाला असता असे स्पष्ट केले.

यावेळी केसरकर यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते असे सांगितले. त्यावर प्रसारमाध्यमांनी मग उध्दव ठाकरे शिवसैनिक नाहीत का? असा सवाल केला असता दिपक केसरकर म्हणाले, उध्दव ठाकरे हे शिवसैनिक नाहीत असे सांगत उध्दव ठाकरेंवर टीका केली.

Check Also

विविध घोटाळ्यांची चौकशी करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील अनेक भरती घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआय (CBI) अधिकाऱ्याचा जम्मूमध्ये अपघाती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *