Breaking News

राजकारण

सार्वजनिक बांधकाम विभागातील भूखंडांची ‘लॅण्ड बॅंक’ सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे राज्यात अनेक भूखंड आहेत. यापैकी अनेक भूखंडांचा सध्या वापर होत नाही. तर बहुतेक जागांवर विविध विभागांची शासकीय कार्यालये भाडे तत्वावर आहेत. या सर्व भूखंडाची एकत्रित माहिती गोळा करुन त्या सर्व भूखडांची एक ‘लॅण्ड बॅंक’ तयार करण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. …

Read More »

शिवसेना विरूध्द शिवसेनेची पहिली टेस्ट, अंधेरी विधानसभा निवडणूक जाहिर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक -२०२२ कार्यक्रम

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी करत वेगळी चुल मांडली. त्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेवरच दावा करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे अंधेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आज निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यामुळे शिवसेना विरूध्द शिवसेनेची पहिली लिटमस टेस्ट …

Read More »

नाना पटोले म्हणाले, पोकळ चिंता व्यक्त करण्यापेक्षा आरएसएसने मोदी सरकारलाच सांगा सामाजिक विषमतेचे बीज राष्ट्रीय स्वसंयेवक संघानेच पसरवले

केंद्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे भाजपाचे सरकार आल्यापासून देशात महागाई, गरिबी व बेरोजगारीची स्थिती चिंताजनक बनलेली आहे. यावर विविध स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर आसूड ओढले जात आहेत, लोकांमध्ये प्रचंड संताप असूनही मोदी सरकार त्याकडे लक्ष देत नाही. आज राष्ट्रीय स्वसंयेवक संघाला त्याची जाणीव झाली हे विशेष म्हणावे …

Read More »

शरद पवार म्हणाले, … ते मी कधीही ऐकलं नाही एक शिवसेना तर दुसरी शिंदे सेना दोघात तिसऱ्या पक्षाने येण्याचे कारण नाही

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना शिवसेनेने भाजपाबरोबरील युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन कऱण्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश असलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने काँग्रेसला दिला होता असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. त्यावरून राज्यातील चर्चेच्या फेऱ्या खाली बसल्या नाहीत तोच दाव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …

Read More »

अतुल लोंढे म्हणाले, त्या धसक्याने भाजपाला ‘सर्वधर्मसमभाव’ची आठवण वायुसेनेच्या कार्यक्रमात पंडितजींबरोबरच मौलवींकडूनही प्रार्थना

खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पदयात्रेला सर्व जाती-धर्माच्या लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेची दखल भाजपा व आरएसएसला घ्यावी लागत आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टर वायुसेनेला सुपूर्द करण्याच्या जोधपूर येथील कार्यक्रमात सर्व धर्माच्या पंडितांकडून प्रार्थना करण्यात आली. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार राज्यभर ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार

राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार आहे’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमात दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, राज्यभर सुमारे ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणे, बाल आरोग्यावर विशेष लक्ष …

Read More »

नारायण राणे यांची घोषणा, महात्मा गांधीजींच्या जीवनपटावर आधारित स्मारक उभारणार एमगिरी येथे सेवाग्राम औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन

वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. या कर्मभूमीत त्यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज येथे केली. महात्मा गांधी औद्योगिकरण संस्थान (एमगिरी) येथे तीन दिवसीय सेवाग्राम औद्योगिक महोत्सव प्रदर्शन, विक्री आणि कार्यशाळेचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते …

Read More »

महात्मा गांधी यांचे विचार कृतीत आणण्यासाठी शासन प्रयत्नशील राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप

सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडून बापूजींनी तो लढा खऱ्या अर्थाने एका मोठया जनांदोलनात परावर्तित केला. बापूजी सर्वसामान्य माणसाच्या सेवेला ईशसेवा – देशसेवा मानत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपित्याचे विचार कृतीत आणण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी जाणिवेने काम केले जात आहे म्हणून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता …

Read More »

घोषणाबाजीवर दिपक केसरकर संतापून सुप्रिया सुळेंसमोरच म्हणाले, होणार नाही.. शिक्षण संस्था चालकांनाच सुनावले

ऐरवी फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरून आक्रमकपणे टीका करणारे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी तसे इतरवेळी शांत असल्याचे अनेकवेळा राज्यात दिसून आले. मात्र आज सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री केसरकर हे पुन्हा एकदा संतापलेले दिसले आणि संतापाच्या भरातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर …

Read More »

मिळालेल्या धमकीवरून एकनाथ शिंदे म्हणाले, या धमक्यांचा माझ्यावर परिणाम… मी जनतेतला माणूस मला कोणीही रोखू शकणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या धमकी नाट्यामागे नक्षलवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनीही चिंता व्यक्त केली. मात्र याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून शिंदे म्हणाले, …

Read More »