Breaking News

राजकारण

देवेंद्र फडणवीस, कचरामुक्तीव्दारे शहरांचा पूर्णपणे कायापालट करणार

शहरीकरण हा अभिशाप नसून शहरीकरणाचे आता सुनियोजित व्यवस्थापन करण्याची गरज आहे. शहरे ही विकासाची केंद्र असून शहरातच रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. स्वच्छतेत राज्य नेहमीच अग्रेसर असून महाराष्ट्र राज्य २०१७ मध्ये हागणदारीमुक्त झाले. यापुढील काळात स्वच्छ आकांक्षी स्वच्छतागृहे परिवर्तन घडवून आणतील. कचरा व्यवस्थापनात आता सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावर …

Read More »

मंत्रिमंडळातील समावेशावरून प्रताप सरनाईक यानी व्यक्त केली तीव्र नाराजी प्रताप सरनाईक अन् मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील मतभेदाच्या चर्चेला उधाण

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन अडीच तीन महिने उलटत नाही तोच या सरकारमध्येही सगळे काही ठाकठिक सर्वकाही अलबेल आहे असे म्हणता येणार नाही. कोणी मंत्री पदावरून नाराज तर कोणी पालकमंत्री निवडीवरुन नाराज, कोणी चांगलं खातं मिळालं नाही म्हणून मंत्री पदावरून नाराज. एकूण सर्वत्र नाराजी दिसून येते. काही आमदार म्हणतात …

Read More »

सुप्रियाताईंची स्मरणशक्ती वाढावी यासाठी लागणारे टॉनिक आम्ही लवकरच पाठवू राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांचे प्रत्युत्तर

राज्यातील सत्ता गेल्याचा धक्का सुप्रिया ताई अजून पचवू शकलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांची स्मरणशक्तीसुध्दा कमी झालेली दिसतेय. त्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना एखादे टॉनिक आम्ही लवकरच पाठवू असं प्रत्युत्तर शिंदे गटाच्या शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळे याना दिले आहे. गेल्या दीड दोन महिन्यात महाराष्ट्राची प्रचंड बदनामी झाली असे वक्तव्य करणाऱ्या …

Read More »

भाऊराव पाटील म्हणायचे की माझ्या दाढीला जेव्हढे केस आहेत तेवढे… शाळकरी मुलांची कोणतीही गैरसोय आम्ही होऊ देणार नाही, शिक्षण संस्थांच्या अडचणी आम्ही दूर करू - छगन भुजबळ

समतेच्या वाटेने जाणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी नेहमी बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यांनी लावलेले रयत शिक्षण संस्थेचे रोपटे आज वटवृक्ष झाला आहे. बहुजनांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या भाऊराव पाटील यांचा सन्मान करणे आमचे कर्तव्यच आहे असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. आज निफाड तालुक्यातील विंचूर येथील कर्मवीर …

Read More »

मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का, महंत सुनिल महाराजांचा शिवसेनेत प्रवेश संजय राठोड यांचा पराभव अटळ

बंजारा समाजाचे नेते म्हणून ओळख असलेल्या संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे. बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. एका महिलेच्या आत्महत्येस जबाबदार असल्याच्या आरोपा वरून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्री करा म्हणून मागणी करणारे महंत सुनिल महाराज आघाडीवर होते. संजय राठोड यांनी …

Read More »

‘भारत जोडो’च्या मदतीच्या मोबदल्यात दसरा मेळाव्यासाठी काँग्रेसी गर्दीची तडजोड भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची घणाघाती टीका

महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तित्व पुसले जाण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून बुडत्या काँग्रेसला वाचविण्यासाठी शिल्लक सेनेचा हात पुढे करण्याची ठाकरे यांची तडजोड आता दोन्ही पक्षांना बुडविणार आहे, अशी घणाघाती टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. तसेच केशव उपाध्ये म्हणाले, शिवाजी …

Read More »

रश्मी ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात, आनंद आश्रम आणि नवरात्रौत्सवाला हजेरी आनंद दिघेंचे दर्शन घेत देवीची केली आरती

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सव राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येतो. या उत्सवाला गुरुवारी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावत महाआरती केली. यानिमित्ताने ठाकरे गटाकडून उत्सवाच्या परिसरात मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तसेच महाआरतीनंतर …

Read More »

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय

अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. याचा राज्यातील अंदाजे ५ लाखांपेक्षा अधिक …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, काही लोक ढळली पण खरे अढळ आहेत ते… आपल्याला लढाई जिंकायची आहे

उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर पुणे यवतमाळच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दसरा मेळावा, निवडणूक आयोगातील लढाई यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांनाही लक्ष्य केलं. उध्दव ठाकरे म्हणाले, माझ्यासोबत जुनी माणसं आहेत, पण सोबत नवीन येत आहेत याचा आनंद आहे. शिरुरमधील काही लोक ढळली, पण जे खरे अढळ …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, अशोक चव्हाण यांनी जो गौप्यस्फोट केला त्यात तथ्य… मराठा समाजाबद्दलचे तानाजी सावंतांचे वक्तव्य तीच भूमिका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची...

२०१४ साली अशोक चव्हाण यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन शिवसेना – कॉंग्रेस आघाडीबाबत चर्चा केली असा अशोक चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला असेल तर त्यात तथ्य असणे स्वाभाविक आहे, असे मत व्यक्त करतानाच सध्या मुख्यमंत्र्यांनी जी युती केली आहे ती कशासाठी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असा टोलाही राष्ट्रवादी …

Read More »