Breaking News

राजकारण

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेतले “हे” महत्वाचे निर्णय

दर आठवड्याला होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मागील आठवडाभरात झाली नाही. त्यामुळे गतवेळी प्रस्तावित असलेले विषय आणि सध्याच्या चालू आठवड्यातील नवे विषय घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरूवारी झाली. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जवळपास १४ हून अधिक निर्णय घेण्यात आले.  ते निर्णय खालीलप्रमाणे नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी …

Read More »

शिंदे-फडणवीसांचा मोठा निर्णयः या स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ

राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे  निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना १० हजार रुपयांऐवजी दरमहा २० हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ मिळणार आहे. या …

Read More »

शेतमजूर महिला म्हणतात, राजकारणाशी संबध नाही राहुल गांधींसाठी आलोय

गरिबाला स्वस्त धान्य मिळायला पाहिजे. स्वस्तात गॅस पाहिजे. मदत मिळायला पाहिजे, नाहीतर आम्ही जगायचे कसे? आमची पोरं कशी शिकणार ? हा प्रश्न आहे मेडशीच्या पद्मिनी सुरेश थोरात यांना पडलेला. त्या शेतमजूर आहेत. अशिक्षित आहेत. राजकारणाशी संबंध नाही. पण राहुल गांधीचे भाषण ऐकायला उपस्थित होत्या. रोज दोनशे रुपये हजेरीवर शेतात मजुरीला …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेचे आदेश, अर्ज निकाली काढण्याची मोहिम सुरूच ठेवा सेवा पंधरवडा काळात ९५ टक्के अर्ज निकाली

राज्यात १७ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवडा कालावधीत विविध १४ सेवा आणि पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणांचा ९५ टक्के निपटारा करण्यात आला आहे. या मोहिमेत एकूण ८३ लाख ५७ हजार २१८ प्रलंबित अर्जांपैकी ७९ लाख ४५ हजार २२ अर्ज निकाली काढण्यात आले. याबद्दल आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत …

Read More »

नितीन गडकरी यांना आली कार्यक्रमातच भोवळ; ममता बॅनर्जीकडून चौकशी

पश्चिम बंगाल मधील सिलीगुडी इथल्या डागापूर मधील कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. परंतु कार्यक्रमा दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. दरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडली. भोवळ आल्यानंतर त्वरीत जवळच्या रुग्णालयाचं पथक कार्यक्रमस्थळी पोहोचलं आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नितिन गडकरी यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे यांची प्रकृती खालावली …

Read More »

राहुल गांधी यांनी भाजपाला आव्हान देत जाहिर केले सावरकरांचे ते पत्रः पत्र वाचा

मागील काही दिवसापासून स्वा. वि.दा.सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भाजपासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत, भाजपाला सावकरांच्या माफीनाफ्यावरून खुल्या चर्चेचे आव्हान देत सावरकरांनी ब्रिटीशांकडे माफी मागितल्याचे पत्रच जाहिर करून टाकले. भारत …

Read More »

उध्दव ठाकरेंनी केलेल्या नियुक्त्या रद्द करताना ठाकरेंबरोबर शिंदे गटाचे आमदार घरी

राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णय स्थगित करण्याचा तर निधी वाटपाला ब्रेक लावण्याचा निर्णय विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारकडून सातत्याने घेण्यात येत आहे. यात आता विविध शासकिय महामंडळे, मंडळे आणि प्राधिकरणावरील अशासकिय अर्थात राजकिय व्यक्तींच्या नियुक्त्या उध्दव ठाकरे यांच्या काळात महाविकास आघाडी सरकारने केल्या होत्या. …

Read More »

राहुल गांधींचा टोला, तुमच्याशी ‘मन की बात’ नाही तर ‘तुमची मन की बात’ ऐकण्यास आलो

भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली असून श्रीनगरमध्ये जाऊनच थांबणार आहे. या पदयात्रेत दररोज हजारो लोक भेटून त्यांच्या समस्या सांगतात, तरुण मुले मुली शिक्षण घेऊन नोकरीची प्रतिक्षा करत आहेत. शेतक-याच्या शेतमलाला भाव मिळत नाही. काही राजकीय पक्षाचे नेते येतात आणि मन की बात करतात पण मी तुमची मन की बात …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अॅड आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीकडून प्रतिसाद नाही

महाविकास आघाडीमधील काही घटक यांची माझ्याशी चर्चा झाली. त्या चर्चेत मी महाविकास आघाडी एकत्र राहणार आहे का? आणि राहिल्यास त्यात वंचित बहुजन आघाडी कशी समाविष्ट होणार याचा काही आराखडा आखला आहे का अशी विचारणा केली होती. पण अद्याप महाविकास आघाडीच्या घटकांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, अशी माहिती वंचितचे प्रमुख अॅड …

Read More »

नाराज आमदारांशी मुख्यमंत्री शिंदेंची बंद दाराआड चर्चा

शिवसेनेशी बंडखोरी करत महाविकास आघाडीला सत्तेतून खाली खेचून एकनाथ शिंदे यांनी राज्यात वेगळी चूल मांडली. त्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या ४० आमदारांपैकी रोज कोणी ना कोणी ना कोणी या ना त्या कारणास्तव नाराज असल्याच्या चर्चा वारंवार येत आहेत. त्यावर तोडगा म्हणून मुख्यमंत्र्यांनी नाराज …

Read More »