Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अॅड आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीकडून प्रतिसाद नाही

महाविकास आघाडीमधील काही घटक यांची माझ्याशी चर्चा झाली. त्या चर्चेत मी महाविकास आघाडी एकत्र राहणार आहे का? आणि राहिल्यास त्यात वंचित बहुजन आघाडी कशी समाविष्ट होणार याचा काही आराखडा आखला आहे का अशी विचारणा केली होती. पण अद्याप महाविकास आघाडीच्या घटकांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, अशी माहिती वंचितचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकरांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह या निवासस्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली त्या प्रसंगी आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांपासून अॅड प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे गटाची युती होणात याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असताना २० नोव्हेंबरला उद्धव ठाकरे आणि अॅड आंबेडकर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार असल्याने या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

२० तारखेचा प्रबोधनकार यांच्याशी संबंधीत पोर्टल उदघाटनाचा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वी आधीच ठरला होता. प्रबोधनकार आणि बाबासाहेब यांचे संबंध जवळचे असल्याने त्यांनी या पोर्टलच्या उद्धाटनास येण्याची विनंती केली होती. त्यांना मी होकार दिला असून, हजर राहणार आहे. पण महाविकास आघाडीचं जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत राज्यातील राजकीय चर्चेचं पुढे काही सांगता येत नाही, काँग्रेसचे काही नेते भेटले. त्यांच्याशी चर्चा झाली. शिवसेनेशी राजकीय चर्चा झाली नाही. पण काही नेते भेटले हे खरं आहे. पण ते फक्त २० तारखेच्या कार्यक्रमासंबंधी भेटले, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही. त्यांच्याशी समाज रचनेसंबंधी आमचं भांडण आहे. जोपर्यंत त्याबाबत विचार केला जात नाही तोपर्यंत भाजपासोबत जाणार नाही. जे कोणी भाजपासह जातील त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही असे आंबेडकर यांनी रामदास आठवले यांचे नाव न घेता सांगितले, त्यामुळे महाविकास आघाडीने काही प्रतिसाद दिला नाही तर फक्त स्वबळावर लढण्याचा पर्याय आमच्याकडे आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *