Breaking News

नितीन गडकरी यांना आली कार्यक्रमातच भोवळ; ममता बॅनर्जीकडून चौकशी

पश्चिम बंगाल मधील सिलीगुडी इथल्या डागापूर मधील कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. परंतु कार्यक्रमा दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. दरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडली. भोवळ आल्यानंतर त्वरीत जवळच्या रुग्णालयाचं पथक कार्यक्रमस्थळी पोहोचलं आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नितिन गडकरी यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे यांची प्रकृती खालावली असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले. मात्र सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितले.

पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये सरकारी योजनांचं उद्घाटन करण्यासाठी नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांनी सिलीगुडीमध्ये १२०६ कोटी रुपये खर्चाच्या ३ राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हा कार्यक्रम सुरु असतानाच त्यांची प्रकृती बिघडली. यानंतर सुकना इथलं प्राथमिक आरोग्य केंद्राचं पथक कार्यक्रमास्थळी पोहोचलं आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.

याआधी एका कार्यक्रमा दरम्यान गडकरींची प्रकृती बिघडली होती.
कार्यक्रमा दरम्यान नितीन गडकरी यांची प्रकृती खालावण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी डिसेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली होती. गडकरी मंचावरच चक्कर आली होती. यावेळी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव हे देखील उपस्थित होते. त्यांनीच गडकरी यांना त्यावेळी आधार दिला होता. यानंतर नितीन गडकरी यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तर त्याआधी एप्रिल २०१० मध्ये दिल्लीतील जंतरमंतर एका कार्यक्रमात ते चक्कर येऊन पडले होते.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून प्रकृतीची विचारपूस
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नितीन गडकरी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. यासोबतच ममता बॅनर्जी यांनी सिलीगुडीच्या पोलीस आयुक्तांना त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.

नितीन गडकरी यांना टाईप २ प्रकारचा मधुमेह असून वजन कमी करण्यासाठी त्यांच्यावर सप्टेंबर २०११ मध्ये वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया वजन कमी करण्यासाठी केली जाते. नितीन गडकरी यांचा सिलीगुडी दौरा हा उत्तर बंगालमध्ये पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प राबवण्यास उत्सुक होते भाजपच्या योजनेचा एक भाग असल्याचं म्हटलं जातं. नितीन गडकरी यांचे आज अनेक पूर्वनियोजित कार्यक्रम होते ते रद्द करण्यात आले.

Check Also

ब्रिजभूषण शरण सिंह यांना भाजपाने डावलत त्यांच्या मुलाला दिली उमेदवारी

महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केलेले कैसरगंजचे विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना भाजपाने डावलून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *