Breaking News

राजकारण

काँग्रेस म्हणते, समन्वय समितीच्या आडून आंतरधर्मीय विवाहाला विरोध करणे हा सरकारचा हेतू शिंदे-फडणवीस सरकार महिलांप्रती काळा कायदा आणू इच्छिते...

महिला संरक्षणाच्या नावाने त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याच्या हेतूने महिला व बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यांची आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकार महिलांप्रति काळा कायदा आणू इच्छिते, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो व या कायद्याला समस्त महिलावर्गाने विरोध करावा असा आग्रह …

Read More »

सोमय्या पिता-पुत्राच्या क्लीनचिटनंतर संजय राऊत म्हणाले, हिशोब केला जाईल.. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिली माहिती

भारतीय नौदलाची युध्दनौका आयएनएस विक्रांत सैन्यदलातून निवृत्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर भाजपाचे खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी विक्रांत खरेदी करून त्याचे स्मारकात रूपांतर करण्यासाठी मुंबईत निधी गोळा केला. या निधीप्रकरणी मुंबई पोलिसांनी शिवसेनेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला. मात्र निधी अपहार प्रकरणी सोमय्यांच्या विरोधात कोणतेही …

Read More »

नाना पटोलेंचा सवाल, गुजरातच्या मुंद्रा बंदरात हजारो टन ड्रग्ज राजरोस कसे येतात? देशातील तरुणपिढीला नशेच्या आहारी घालवण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र

भारताकडे तरुणांचा देश म्हणून पाहिले जात असून १६ ते ४० वयोगटातील देशातील लोकसंख्या ५० टक्के आहे, ही तरुणपिढी देशाचे भवितव्य आहे. देशाचे भवितव्य असेलली ही पिढीच नशेखोर बनत असून देशातील १० ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याने त्याची दाहकता किती आहे …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, समृध्दीचा रस्ता चांगलाच, मग विमानही आहेच की… ५२० किमीच्या मार्गासाठी इतका टोल सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूरमध्ये झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. नागपूर ते शिर्डी असा पहिला टप्पा आता नागरिकांसाठी खुला करण्यात आला. मात्र, या महामार्गासाठी भरावा लागणारा टोल चर्चेचा …

Read More »

प्रेतयात्रा काढण्यावरून सुषमा अंधारे म्हणाल्या, मी एकाही राजकिय पक्षाची क्षमा…. आळंदीत प्रतिकात्मक काढली प्रेतयात्रा

शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सुषमा अंधारेंनी हिंदू देवी-देवतांना आणि साधु संतांबद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावरून महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ आक्रमक झाला आहे. वारकरी महामंडळाकडून सुषमा अंधारेंविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आल्याची माहिती …

Read More »

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना २ जानेवारीपासून प्रारंभ क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन

महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धांना २ जानेवारी २०२३ पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथून सुरूवात होणार आहे. क्रीडा प्रकारानुसार राज्यातील निवडक शहरांच्या ठिकाणी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांकरिता खेळाडूंना उत्तम कामगिरी करण्याची संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, इंदू मिलमधील स्मारकातील पुतळ्याला विरोध डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचा समावेश

दादर येथील इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होत आहे. मात्र या स्मारकात सर्वाधिक उंच पुतळा असावा ही जनतेची मागणी नव्हे तर काँग्रेसची आहे. तसेच स्मारकातील पुतळ्याला आपला विरोध असून  स्मारकात पुतळ्याऐवजी आंबेडकरांचा वैचारिक वारसा सांगणारे ऑक्सफर्ड आणि बॉन सारख वैचारीकतेची देवाण-घेवाण करणारी संस्था असावी असे भूमिका वंचित …

Read More »

दिपक केसरकर म्हणाले, नक्षलवादी चळवळीतील व्यक्तीच्या पुस्तकाला पुरस्कार नाहीच कोबाद गांधी यांच्या फ्रॅक्चरड् फ्रिडम पुस्तकाला दिलेल्या पुरस्कार रद्द

राज्य सरकारच्या राज्य साहित्य, संस्कृती मंडळाने कोबाद गांधी यांच्या फ्रॅक्चरड फ्रिडम या मराठी अनुदावित पुस्तकाला पुरस्कार जाहीर केला. मात्र हे पुस्तक एका नक्षलवादी चळवळीत कोबाद गांधी यांनी काम केलेले असून १० वर्षे झाले तुरुंगात आहेत. देशात नक्षलवादावर बंदी आहे. त्यामुळे या नक्षलवादी चळवळीतील व्यक्तीच्या पुस्तकाला राज्य सरकारचा पाठिंबा असणे शक्य …

Read More »

आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा मंजूर, कामगार कायद्यात होणार सुधारणा राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

देवेंद्र फडणवीस सरकारचे लाडके महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकृत करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आता आशुतोष कुंभकोणी यांच्या ठिकाणी अँड. विरेंद्र सराफ यांची महाधिवक्ता पदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा मंत्रालयात सुरु झाली आहे. सराफ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय दोन आठवड्यानंतर झाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक

गुजरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास दोन आठवडे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली नाही. त्यामुळे आज शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेत एकदम १५ निर्णय घेतले. यामध्ये कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुषंगाने आणि शाळा आणि ग्रंथालय अनुदान मंजूर, यासह अनेक महत्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले. जवळपास १५ निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले ते …

Read More »