Breaking News

प्रकाश आंबेडकर म्हणाले, इंदू मिलमधील स्मारकातील पुतळ्याला विरोध डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचा समावेश

दादर येथील इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होत आहे. मात्र या स्मारकात सर्वाधिक उंच पुतळा असावा ही जनतेची मागणी नव्हे तर काँग्रेसची आहे. तसेच स्मारकातील पुतळ्याला आपला विरोध असून  स्मारकात पुतळ्याऐवजी आंबेडकरांचा वैचारिक वारसा सांगणारे ऑक्सफर्ड आणि बॉन सारख वैचारीकतेची देवाण-घेवाण करणारी संस्था असावी असे भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

काल मंगळवारी प्रकाश आंबेडकर यांनी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यासह पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

या स्मारकात आंतरराष्ट्रीय केंद्राचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यादृष्टीने स्मारक प्रकल्पात सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारीत प्रकल्प आराखड्याला आज प्राथमिक मंजुरी देण्यात आल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी अॅड आंबेडकर यांनी सांगितले की, प्रस्तावित स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी होत आहे. मात्र सदर पुतळ्या आपला विरोध असल्याचे सांगत आंबेडकर म्हणाले की, पुतळा असावा ही जनतेची मागणी नसून कॉग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना इंदू मिलची जागा स्मारक नव्हे तर बाबासाहेबांच्या नावाने आंतरराष्ट्रीय केंद्र ऑक्सफर्ड किंवा बॉन अशा संस्था जिथे विचारांची देवाण घेवाण होते अशा संस्था उभारण्यासाठी दिली होती. परंतू बाबासाहेब आणि काँग्रेस याचं नातं सर्वांना माहित असल्यामुळे ते काम झाले नाही, असे सांगत या शिंदे फडणवीस सरकारने या बाबी मनावर घेतल्या असे आंबेडकर म्हणाले.

वाजपेयींच्या संकल्पने प्रमाणे त्या केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या विषयांवर काम होईल. अशा प्रकारच्या संस्था मुंबई, पुणे, बेंगलोर अशा आंतरराष्ट्रीय शहरात उभारल्या पाहिजेत. त्यामुळे स्मारकाच्या आराखड्यात तशी सुधारणा एमएमआरडीए केली आहे. तो आराखडा प्रदर्शिक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा या स्मारकात उभारला जाणार आहे. त्याची पाहणी आंबेडकर कुटुंबियांनी करावी अशी विनंती सरकारच्या वतीने करण्यात आली होती, अशी माहिती मंत्री केसरकर यांनी दिली. २००३ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांची संकल्पना काय होती ती भूमिका केसरकर यांनी विशद केली.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *