Breaking News

चंद्रकांत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा भारतीय बौद्ध महासभेची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा जोतीराव फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महापुरुषांबाबत अपमान कारक वक्तव्ये काही राजकीय व्यक्ती, सरकारचे प्रतिनिधी, मंत्री इत्यादी मात्तबर लोक करत असून त्यामुळे समाजातील वातावरण बिघडविन्याचे  काम होत आहे. चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर  आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागितली असे अपमानकारक शब्द वापरून या महापुरुषांचा अपमान केल्याने त्यांच्यावर अँट्रॉसिटीचा  गुन्हा दाखल करावा  आणि त्यांच्यावर शाई फेकणाऱ्या मनोज गरबडे याच्यावर  सरकार ने चुकीचे लावलेले ३०७ , १२०ब  कलम व पोलिसांचे निलंबन तात्काळ रद्द करावे अशी मागणी भारतीय बौद्ध महासभेने  केली आहे .

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र दिवंगत भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या ११० व्या जयंती दादर पूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे मुंबई प्रदेश अध्यक्ष उत्तम मगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांचा तीव्र निषेध करण्यात आला. संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉ हरिष रावलिया हे प्रमुख अथिती म्हणून यावेळी उपस्थित होते.  त्यांनी यशवंतराव आंबेडकर यांच्या जीवनातील काही घटना सांगून देशात भारतीय संविधान बदलण्याचा डाव चालू असून त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल असे सांगितले.

ट्रस्टी कॅप्टन प्रविण निखाडे यांनी भैय्यासाहेब यांनी केलेल्या धम्म कार्यावर प्रकाश टाकून सर्वांनी धम्म कार्यासाठी वाहून घेतले पाहिजे असे सांगितले.

राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे यांनी भय्यासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध झाल्याने  कधीही राखीव जागेचा व  दलित मित्र पुरस्काराचा फायदा घेतला नाही, देशात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचेव समतेचे विरोधक संविधान बदलणार असल्याने संविधान वाचविण्यासाठी वेळ पडली तर भारतीय बौद्ध महासभेला  रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागेल असे सांगितले तसेच  महात्मा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांचा अपमान केल्याबद्दल भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध करून समता सैनिक दलाचा कार्यकर्ता मनोज गडबडे याच्यावर लावलेले ३०७,१२० कलम रद्द करावे अशी मागणी केली.

भीमराव आंबेडकर ट्रस्टी व  राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष ,समता सैनिक दल)यांनी  मुंबई उच्च न्यायालयात एफ आय आर रद्दकरण्यासाठी पिटीशन दाखल करण्याबाबत पुण्याचे ऍड असीम सरोदे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. जगदिश गवई आणि सुषमाताई पवार ,राष्ट्रीय सचिव ऍड एस एस वानखडे, केंद्रीय सदस्य एम डी सरोदे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे यांनी भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर, त्यागावर आणि त्यांच्या कार्यावर भाषणे केली.

या सभेस प्रामुख्यानेसंस्थेचे  राजेश पवार ,बी एम कांबळे , सी बी तेलतुंबडे ,रागिनीताई पवार, सुप्रियाताई कासारे ,सुनंदाताई पवार , वैशालीताई अहिरे, चंदाताई कासले,सुनिल बनसोडे, धम्मयानचे एस के खैरे  इत्यादी केंद्रीय पदाधिकारी आणि महाराष्ट्राचे सुशील वाघमारे , विजय कांबळे, मुंबई प्रदेशचे विलास खाडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई प्रदेशचे सरचिटणीस रविंद्र गवई यांनी केले. आणि आभार प्रदर्शन उपाध्यक्ष विलास ढोबळे यांनी केले. या कार्यक्रमास प्रथम समता सैनिक दलाच्यावतीने मेजर जनरल व्हीडी हिवराळे यांच्या संचालनात भैय्यासाहेब यांना सलामी देण्यात आली.

Check Also

फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांचे अप्रतिम छायाचित्रण

आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांना कॅमेऱ्यातून फोटो क्लिक करताना पाहिले असेल, पण आम्ही तुम्हाला फूटपाथवर राहणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *