Breaking News

राजकारण

विनायक राऊत म्हणाले, नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा, सगळं सत्य समोर येईल रमेश गोवेकर, सत्यजित भिसे, बाळा यांच्या हत्या प्रकरणांचे सत्य समोर आणायचं असेल तर

राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा विरूद्ध शिवसेना आणि आता भाजपा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात एकमेकांच्या विरोधातील कुरघोड्या संपता संपत नाहीत. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सतत झडत असतात. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, आता रमेश …

Read More »

संभाजी राजे म्हणाले, अजित पवारांचे वाक्य अर्धे बरोबर… भाजपाच्या मागणीत स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे यांचीही टीका

हिवाळी अधिवेशन काळात विधानसभेत बोलताना संभाजी महाराज यांच्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक वक्तव्य केले. त्यावरून भाजपाने संभाजी महाराज हे धर्मवीर होते. त्यांना मतांसाठी धर्मनिरपेक्षवादी ठरवू नका असे सांगत भाजपाने अजित पवार यांनी सदर वक्तव्यावरून माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर काँग्रेस म्हणते, नोटबंदीचा उद्देश सफल झालेला नाही नोटबंदीआधी आरबीआयच्या कायद्याचे पालन केले होते का नाही? केवळ यासंदर्भातच कोर्टाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाचा सन्मानच आहे परंतु नोटबंदी संदर्भातील निर्णय दुर्दैवी आहे. नोटबंदीला आता बराच कालावधी झाला असून आर्थिक निर्णयाची प्रक्रिया (रिव्हर्स) मागे घेता येत नसेल व त्याचा फायदाही होणार नाही या अनुशंगाने न्यायालयाने विचार केला असावा. पण मोदी सरकारने केलेल्या नोटंबदीचा कोणताही उद्देश मात्र सफल झालेला नाही हे विसरून चालणार नाही …

Read More »

जितेंद्र आव्हाडांकडून प्रत्युत्तर, आधी गोळवलकर आणि सावरकरांनी लिहून काय ठेवलंय ते वाचा अजित पवारांवरील टीकेला आव्हाडांनी संदर्भ देत दिले प्रत्युत्तर

नागपूर हिवाळी अधिवेशनात संभाजी महाराजांचा संदर्भ देताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते असे सांगत पण काही जण त्यांना धर्मवीर म्हणतात असे वक्तव्य केले. यावरून भाजपा आणि संलग्नित संघटनांकडून विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अजित पवारांवर टीकेची झोड उठविली. त्यावरून राजकिय गदारोळ निर्माण करण्याचा प्रयत्न …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माहिती घेऊन आणि तारतम्य बाळगून बोललं पाहिजे अजित पवारांच्या अधिवेशनातील त्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री शिंदेची प्रतिक्रिया

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा-शिंदे गटातील आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून विरोधी पक्षाने हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाला चांगलेच धारेवर धरले. तसेच महापुरूषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी यासाठी नवा कायदा करावा अशी मागणी …

Read More »

हिवाळी अधिवेशनातील त्या भेटीवर दिपक केसरकर म्हणाले, तर शिवसेना एकसंध होईल मी लवकरच एक-दोन दिवसात बोलेन

शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संघर्ष सातत्याने सुरु आहे. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही हा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र अधिवेशन सुरु असताना उपसभापतींच्या दालनासमोर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची चर्चा चांगलीच …

Read More »

अरविंद सावंत म्हणाले, किरीट सोमय्या काही महात्मा नाही, आधीच्या आरोपाचे काय? त्याच्या आरोपाची दखल कोणी घेऊ नये

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. कारण भाजपाचे नेते किरिट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहचले आहेत. किरीट सोमय्या यांनी ३१ डिसेंबरलाच एक व्हिडीओ ट्वीट केला होता. या व्हिडिओत आपण नव्या वर्षात कुणाकुणाचा हिशोब चुकता करणार आहोत, हे …

Read More »

दीपक केसरकर म्हणाले, अब्दुल सत्तार अनेकवेळा गंमतीने बोलत असतात… तर शंभराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्री माग घेतील अनं समजही देतील

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोधकांनी जमीन घोटाळा, कृषी महोत्सवासाठी वसूली या प्रकरणावरुन लक्ष्य केले. तसेच महिला खासदाराबद्दल वापरलेल्या अपशब्दाबाबतही अधिवेशनात नाराजी व्यक्त केली गेली. यामुळे व्यथित झालेल्या अब्दुल सत्तार यांनी थेट शिंदे गटावरच नाराजी व्यक्त केली. ज्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आपल्या विरोधात कट रचला …

Read More »

अब्दुल सत्तार म्हणाले, विरोधातील कटात पक्षातील नेताही सहभागी असू शकतो… मुख्यमंत्र्यांच्या घरातील बैठकीतील माहिती बाहेर

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जमिन वाटपाच्या घोटाळ्याचा मुद्दा पुढे आल्यानंतर शिंदे गटाचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचाही जमिन वाटपाचा आणि टीईटी परिक्षेत सत्तार यांच्या मुलींना फायदा दिल्याचाही घोटाळा उघडकीस आला. मात्र ऐन अधिवेशनात हा मुद्दा कोणी बाहेर पुरविला यावरून शिंदे गटातच आता घमासान सुरु झाल्याचे चित्र दिसून …

Read More »

अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले, आज सहा महिने झाले…त्यातून बाहेर पडा तुमच्या त्या गोष्टीशी आम्हाला घेणं-देणं नाही

विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रस्तावाला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत त्याना आव्हानही दिले. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राईट टू रिप्लाय अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या एकूणच भाषणावरून चांगलेच सुनावले. त्यामुळे ज्या जोरदारपणे मुख्यमंत्री शिंदे …

Read More »