Breaking News

जितेंद्र आव्हाडांकडून प्रत्युत्तर, आधी गोळवलकर आणि सावरकरांनी लिहून काय ठेवलंय ते वाचा अजित पवारांवरील टीकेला आव्हाडांनी संदर्भ देत दिले प्रत्युत्तर

नागपूर हिवाळी अधिवेशनात संभाजी महाराजांचा संदर्भ देताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते असे सांगत पण काही जण त्यांना धर्मवीर म्हणतात असे वक्तव्य केले. यावरून भाजपा आणि संलग्नित संघटनांकडून विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अजित पवारांवर टीकेची झोड उठविली. त्यावरून राजकिय गदारोळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

अजित पवारांवर सतत होणाऱ्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खोचक शब्दात प्रत्त्युतर देत स्वा.वि.दा.सावरकर आणि माधव गोळवळकर यांनी संभाजी महाराज यांच्याबद्दल नेमके काय लिहिले याचा दाखलाच देत भाजपाला निरूत्तर केले.

अजित पवारांच्या त्या विधानानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापविण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत असून अजित पवारांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माधव गोळवलकर यांनी संभाजी महाराज हे स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन होते, असं लिहून ठेवल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरद्वारे केला आहे. तसेच त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकांची पानं शेअर केली आहेत. ज्यामध्ये संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिहिलं आहे. सावरकर आणि गोळवलकर यांच्या पुस्तकातील ही पानं असल्याचं आव्हाडांचं म्हणणं आहे. आव्हाडांचं हे ट्वीट सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, सावरकरांनी आणि माधव गोळवलकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहून ठेवले आहे? ते वाचा… या शूरवीरास बदनाम करण्याचे काम एका वर्गाकडून अनेकवेळा झाले. सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे ‘स्त्रीलंपट’ आणि ‘व्यसनाधीन’ होते. यावर कोणी बोलेल का? असा सवाल आव्हाडांनी विचारला.

शंभूराजे हे स्वराज्य रक्षक आणि धर्मरक्षकही होते. शिवाजी महाराजांनी रयतेसाठी जे स्वराज्य निर्माण केलं, त्याचं रक्षण करण्याचं काम शंभूराजेंनी केलं. त्यांना धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म सगळ्यांना सामावून घेणारा मराठा धर्म अभिप्रेत होता. त्यामुळे स्वराज्य आणि धर्म बाजुला कसे काढता येईल? असा खोचक सवाल आव्हाड यांनी आपल्या ट्वीटद्वारे भाजपाला केला.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *