Breaking News

राजकारण

शंभूराज देसाईंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल, १५ वर्षे सत्तेत येऊ देणार नाही

शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर शिंदे-फडणवीस सरकारची ही पहिलीच दिवाळी होत आहे. यापार्श्वभूमीवर शंभुराज देसाई यांच्या पत्नीने त्यांचे औक्षण केले. या वेळी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी शिंदे सरकारची ही पहिलीच दिवाळी असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढील १५ वर्षे सत्तेत येऊ देणार नाही, असा संकल्पच जाहिर केला. शंभूराज …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही ही एक सामना खेळलो…

काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या दसऱ्या मेळाव्यावरून शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटात न्यायालयीन संघर्ष पाह्यला मिळाला. त्यापाठोपाठ ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमावरूनची लढाई ही न्यायालयात पोहोचली. मात्र न्यायालयाने शिंदे गटालाही परवानगी दिली. त्यानुसार ठाण्यात एकाबाजूला ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे तर दुसऱ्याबाजूला शिंदे गटाकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिंदे …

Read More »

अरविंद सावंत यांचा शिंदेंवर निशाणा, ते मैदानात राहुन लढले उगाच तुलना करू नका औरंगाबाद दौऱ्यावरून उध्दव ठाकरेंवर टीका करणाऱ्याना प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदेंवर पलटवार

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी औरंगाबादचा दौरा करत तेथील शेतकऱ्यांची कैफियत जाणून घेतली. तसेच शेतकऱ्यांना ५० हजार रूपयांची मदत करा अशी मागणीही त्यांनी केली. उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून भाजपाबरोबर शिंदे गटाकडूनही टीका करण्यात येत आहे. त्यातच आज …

Read More »

रामदास कदम यांची टीका, उध्दव ठाकरे फक्त दिखाव्यासाठी गेले… औरंगाबादच्या दौऱ्यावरूनव साधला निशाणा

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची हाती आलेली पिके गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक आरिष्टाला सामोरे जावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ओल्या दुष्काळाची पाहणी करत त्यांची कैफियत जाणून …

Read More »

शरद पवार म्हणाले, कुणी सांगितले मी म्हातारा झालोय, तुम्ही काय बघितलंय? कोकणातील लोक आता मुंबईत जात नाही

देशाची आणि राज्याची ज्यांच्याकडे सूत्रे आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. मात्र, ती टाकण्याची त्यांची तयारी दिसत नाही. १९७८ ला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा खेड्यापाड्यात मोठा दुष्काळ होता. तेव्हा १५ दिवसात मी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. माझ्याकडे केंद्राची जबाबदारी आली, …

Read More »

शरद पवार म्हणाले, तेंडूलकरला स्टेडियम बांधायला सांगितले तर…. आशिष शेलार यांना दिलेल्या पाठिंब्यावरून पवारांनी केला खुलासा

नुकत्याच झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपा आमदार आशिष शेलार यांना पाठिंबा देत त्यांना अध्यक्ष पदी निवडूणही आणले. विशेष म्हणजे या निवडणूकीत माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पराभव झाला. एमसीएच्या निवडणूकीत या युतीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवर सूचक शब्दात आरोप …

Read More »

बच्चू कडू यांनी दिली रवी राणा यांना १ नोव्हेंबरपर्यतची मुदत

एकनाथ शिंदे समर्थक प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आणि भाजपा समर्थक आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. बच्चू कडू यांनी आज रवी राणा यांना आव्हान देत केलेल्या १ नोव्हेंबर पर्यत केलेल्या आरोपानुसार पुरावे द्या अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला. त्यामुळे आगामी काळात बच्चू कडू …

Read More »

संजय शिरसाट म्हणाले, १५ मिनिटात दुष्काळ पाहणी दौरा यासारखं आश्चर्य नाही… दौऱ्यावरून उध्दव ठाकरेंवर केली टीका

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला. उध्दव ठाकरे यांनी औरंगाबादेतील पेंढापूर आणि दहेगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी …

Read More »

एकनाथ खडसे म्हणाले, राजकियदृष्ट्या संपविण्यासाठीच भूखंड प्रकरण

भोसरी भूखंड प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबत पुणे न्यायालयाने संशय व्यक्त करत एकनाथ खडसे यांना अटक करण्यापासून मज्जाव केला. तसेच नव्याने फेर चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज मुक्ताई नगर येथे पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीष महाजन यांचे नाव न …

Read More »

डॉ नीलम गोर्‍हे म्हणाल्या, उध्दव ठाकरेंचे नेतृत्व देशस्तरीय

शेतकर्‍यांची जी परवड झाली आहे. अवकाळी पावसाने जी शेतकर्‍यांची नुकसाने झाली आहेत. दुष्काळात तेरावा महिना आला की काय अशी परिस्थिति शेतकर्‍यांची झाली आहे. अनेक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या घडत आहेत. शेतीला आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना पुरेशी मदत शासनाकडून मिळत नाही. यामुळे ते हवालदिल झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर आज २३ ऑक्टोबर २०२२ …

Read More »