Breaking News

नवे पालकमंत्री जाहीर: मात्र बहुतांश जिल्हे भाजपा मंत्र्यांकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पार पडल्यानंतर आणि अधिवेशन काळात नैसर्गिक संकट असल्याने पालकमंत्री नेमा अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारकडे करण्यात येत होती. मात्र आता नैसर्गिक संकट काही प्रमाणात ओसरले असले तरी अद्यापही काही ठिकाणी पावसाची हजेरी आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आज उशीराने का होईना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची नियुक्त्या आज केल्या. मात्र राज्यातील अनेक जिल्हे भाजपाच्या मंत्र्यांकडे सोपविण्यात आले आहेत. तर शिंदे गटाकडे फक्त त्यांचेच मतदारसंघ असलेले जिल्ह्यांच्या पालक मंत्री पदी नियुक्त्या करण्यात आल्याने पालकमंत्री नेमण्याच्या जिल्ह्यावरही भाजपाचाच वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर करताना मागील वेळी नगरविकास मंत्री असताना त्यांच्याकडे असलेला गडचिरोली जिल्हा यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविला असून त्याचबरोबर नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी सोपविली आहे.

तर भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे अहमदनगर-सोलापूर, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे चंद्रपूर- गोंदिया, चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे, विजयकुमार गावित यांच्याकडे नंदूरबार, गिरीश महाजन यांच्याकडे धुळे-लातूर-नांदेड, सुरेश खाडे यांच्याकडे सांगली, रविंद्र चव्हाण यांच्याकडे पालघर-सिंधुदूर्ग, अतुल सावे यांच्याकडे जालना-बीड आणि मंगल प्रभात लोढा यांच्याकडे मुंबई उपनगर शहराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बुलढाणा- जळगांव, संदीपान भुमरे यांच्याकडे औरंगाबाद, उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी-रायगड, अब्दुल सत्तार यांच्याकडे हिंगोली, दिपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहर-कोल्हापूर आणि शंभूराज यांच्याकडे मुख्यमंत्री शिंदे यांचा जिल्हा असलेला ठाणे आणि सातारा जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

विशेष म्हणजे पालकमंत्री पदावर नियुक्त्या करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात ठेवून भाजपाच्या ताब्यातील जिल्हे त्यांच्याच मंत्र्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर ज्या मतदारसंघात शिंदे गटाचे मंत्री निवडूण आलेले आहेत. त्यांच जिल्ह्यांची जबाबदारी शिंदे गटाच्या मंत्र्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाच्या आडून राजकिय संतुलन राखण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर, गोंदिया,

चंद्रकांत पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे, लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव

दादा भुसे- नाशिक

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड

तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर, कोल्हापूर,

अतुल सावे – जालना, बीड,

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

Check Also

भाजपाचे शरद पवार यांना प्रत्युत्तर,… संविधान बदलाच्या अफवा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *