Breaking News

राजकारण

शिंदे-फडणवीस सरकारचे १०० दिवस हारतुरे, सत्कार, देवदर्शन व खुर्ची वाचवण्यातच गेले

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थाने करुन पाडून शिंदे-फडणवीस सरकार येऊन १०० दिवस झाले. या १०० दिवसात ईडी सरकारने केवळ हारतुरे व सत्कार स्विकारणे, गणपती मंडळांना भेटी, नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेणे व स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी खटपटी करणे यातच गेले आहेत. राज्यात होत असलेली तब्बल १ लाख ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक …

Read More »

अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केली ‘त्या’ निर्णयाच्या चौकशीची मागणी दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार

सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याच्या गोंडस नावाखाली सरकारने जाहीर केलेल्या दिवाळी पॅकेजमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.मंत्रीमंडळ निर्णयापूर्वीच निविदा काढण्यात आल्याने हा घोटाळा उघडकीस आला असून या दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे …

Read More »

दसरा मेळाव्यासाठी कोट्यवधीची रक्कम जमा करणाऱ्यांची नावे जाहीर करा

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ११ लाख रुपये रक्कम सापडल्यावर त्यांच्यावर ईडीची चौकशी करण्यात आली. मग शिंदे गटाने आयोजित केलेल्या दसऱ्या मेळाव्यासाठी आरक्षित केलेल्या एसटी महामंडळाच्या विशेष बसेससाठी भरण्यात आलेल्या ९ कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम भरलेल्या व्यक्तीची चौकशी करणार का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी …

Read More »

जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे , निहार ठाकरे यांच्या उपस्थितीने काय साधले ? शिंदे गटातील मेळाव्यातील ठाकरे कुटुंबियांच्या सहभागावरून शिवसैनिकांचा सवाल

लक्झरी बसेस, एसटीच्या बसगाड्या खाना खजाना, आणखीवर बक्षिसी रक्कम, दिवसभर सगळ्या टीव्ही चँनेल्स अन्य समाजमाध्यातून जाहिराती आणि अन्य वृत्तपत्राच्या माध्यमांतून नंबर १ च्या मोठ्ठ्या जाहिराती देऊन मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवर मैदानावर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याचा सपशेल फ्लॉप शो झाला. तर जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे …

Read More »

‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणार्‍या मोदींच्या रेल्वे मंत्रालयात चार लाख डॉलरची लाच

‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असं घोषवाक्य घेत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या रेल्वे मंत्रालयात कंत्राट मिळवण्यासाठी चार लाख डॉलरची लाच ओरॅकल कंपनीने दिल्याप्रकरणी २३ मिलियन डॉलरचा दंड युनायटेड स्टेट्स सिक्युरिटी ॲंड एक्स्चेंज कमिशनने कंपनीला ठोठावला असून याप्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज …

Read More »

डॉ श्रीकांत शिंदे यांचे उध्दव ठाकरे यांना खुले पत्र, हे तुमच्या धगधगत्या हिंदूत्वात बसतं का? पापाचे धनी होवू नका अशी कळकळीची विनंती

दसरा दिनाचे औचित्य साधत आपलीच शिवसेना खरी असल्याचे दाखविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्यावतीने दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवाजी पार्क येथे झालेल्या दसरा मेळाव्यात बोलताना उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे दिड वर्षाचे चिरंजीव रूद्रांश याच्यावरही टीका केली. …

Read More »

नाना पटोले यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र, जनतेच्या बँक खात्यात ‘दिवाळी भेट’ जमा करा

राज्य मंत्रिमंडळाने रेशनकार्ड धारकांना दिवाळीसाठी १०० रुपयामध्ये रेशन दुकानातून एक किलो चणाडाळ, साखर, रवा व एक लिटर पामतेल देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारची ही दिवाळी भेट अत्यंत तुटपुंजी आहे. सरकारने महागाईचा विचार करून प्रत्येक कुटुंबाच्या बँक खात्यातच तीन हजार रुपये दिवाळी भेट जमा करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, काँग्रेसला दोष देऊन एकनाथ शिंदेंना गद्दारीचे पाप लपवता येणार नाही बीकेसीवरील मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी वाचली भाजपाची स्क्रिप्ट

मुंबईतील बीकेसी मैदानावरील एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्याला राज्यातील विविध भागातून सामान्य जनतेला खोटी माहिती देऊन भाडोत्री गर्दी जमवण्यात आली होती परंतु या जनतेने शिंदेंचे भाषण न ऐकताच काढता पाय घेतला. राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाच्या हातचे बाहुले असल्याचे राज्यातील जनतेने काल पाहिले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गद्दारीचे समर्थन करत …

Read More »

बीकेसीत शिंदेंच्या समर्थनार्थ ठाकरे कुटुंबिय, जयदेव ठाकरे म्हणाले, एकटे सोडू नका एकनाथ शिंदे याचे चार-पाच निर्णय आपल्याला आवडले

खरी शिवसेना कोणाची यावरून अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. त्याचा निकाल निवडणूक आयोगाच्या आधी आज ५ सप्टेंबर रोजी शिवसेना विरुद्ध शिंदे गटाने केलेल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जनतेच्या दरबारात लागेल. शिंदे गटाने बीकेसी मैदानावरील मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली. त्यातच आता या मेळाव्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे थोरले सुपुत्र जयदेव ठाकरे यांनी …

Read More »

एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही गद्दारी नाही तर गदर केलाय पण गद्दारी झाली… शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर

आम्ही गद्दारी केली नाही, तर गदर केलाय. गदर म्हणजे क्रांती. आम्ही गद्दार नाही, तर बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. ते आम्ही अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले. आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झालीय. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती …

Read More »